कर्जत तालुक्यात धावणार खा. विखेची भु संपादन एक्सप्रेस - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 9, 2021

कर्जत तालुक्यात धावणार खा. विखेची भु संपादन एक्सप्रेस

 कर्जत तालुक्यात धावणार खा. विखेची भु संपादन एक्सप्रेस


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
कर्जत ः नगर-सोलापूर महामार्गासाठी अवघे 28 टक्के भूमी संपादन झाले असून उर्वरित लोकांनी सहकार्य करावे 15 ऑगष्ट पर्यत ही कारवाई पूर्ण करावी लागेल अन्यथा भु संपादनाचे आलेले पैसे कोर्टात जमा होतील असा इशारा खासदार सुजय विखे यांनी देत सदर रस्ता व्हावा ही सर्व लोकप्रतिनिधीची भूमिका आहे असे म्हटले.
कर्जत येथे नगर -करमाळा छक-516- राष्ट्रीय महामार्गावरील भूसंपादन प्रक्रियेचा आढावा कर्जत येथे पं. स. कार्यालय मध्ये खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांनी घेतला. यावेळी भूसंपादन प्रक्रिया ही 15 ऑगस्ट पर्यंत करून घ्यावी अन्यथा सदर जमिनीचे भूसंपादन झाले असे समजून त्याचा मोबदला कोर्टात जमा केला जाईल असा विनंती वजा इशारा यावेळी त्यांनी दिला. या बैठकीत अनेक शेतकर्‍यानी प्रशासनावर ताशेरे ओढले व थेट पाच टक्के दहा टक्के पैसे द्यावे लागतात असा आरोप केला केला तर अधिकाऱयांनी मर्जीतील लोकांची साखळी बनवली असून त्याचे नाव मार्फत मोठ्या प्रमाणात देवाण घेवाण होत असल्याचा आरोपही प्रांताधिकारी नष्टे यांच्या वर खाली करण्यात आला, खा.  विखे हे पण या आरोपा पुढे हतबल झाले व झालेल्या चुका सुधारून पुढे काम करू असे म्हणत पाच गावांना नोटीसा द्यायच्या राहिल्या असून त्या आगामी आठ दिवसात पूर्ण करण्यात येतील असा शब्द प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी दिला तर लोकांना प्रशासना पर्यत आणण्यासाठी भूसंपादन एक्स्प्रेस सुरू करा गाड्या भरून कर्जतला आणा मात्र हा विषय त्वरित मार्गी लावा असे आदेश आपल्या यंत्रनेला देताना कर्जत तालुक्याच्या निवडणुकीत इतर सर्वांनीच जनतेला देव देव घडविण्यासाठी गाड्या लावल्या आपण असे काही केले नाही त्यावेळी वाचलेले पैसे आता खर्च करतो पण लोकांना पैसे मिळाले पाहिजेत असेही विखेनी म्हटले
नगर -करमाळा छक-516- राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांचा मार्ग सुखकर करण्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी नितीन गडकरी यांचाकडून आठ कोटींचा निधी या मार्गावर असणारे खड्डे तसेच अनेक ठिकाणी अस्तरीकरण व दुरुस्ती साठी केंद्र सरकार कडून मंजूर करून घेऊन कामे सुरू केली आहेत, हा रस्ता लवकरात लवकर होणे आवश्यक असून आगामी दोन वर्षात आपला मतदार संघ देशात उजळून निघेल असा विश्वास ही खा विखे यांनी व्यक्त केली केला.
यावेळी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत, प्रकाश शिंदे, सचिन पोटरे, दादासाहेब सोनमाळी, पंचायत समिती सदस्य बाबासाहेब गांगर्डे,
सुनील यादव, ऍड बाळासाहेब शिंदे, शेखर खरमरे, पप्पूशेठ धोदाड, रामदास हजारे, प्रांताधिकारी अर्चना नष्टे, राष्ट्रीय महामार्गाचे दिवाण, तहसीलदार नानासाहेब आगळे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, कर्जत नगर पंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव आदी उपस्थित होते.
कर्जत तालुक्या तुन जाणार्‍या कोंभळी ते कर्जत व कर्जत ते खेड या रस्त्याचे काम कोठारी या काँट्रॅक्तर यांना दिलेले असून सदर काम माझ्या दोन टर्म झाल्या तरी पूर्ण होणार नाही सदरच्या संस्थेचे काम असेच असून त्याचे टेंडर रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करा असे म्हणत या अर्धवट कामामुळे सदर रस्त्यावर अपघात होउन  कोणी तरी मयत झाले असतील तर त्याचे वर फौजदारी करा असे स्पष्ट निर्देश खा विखे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अमित निमकर याना दिले.
  

महिजळगाव परिसरातील पाच गावांतील लोकांना भूसंपादनाच्या नोटिसा मिळाल्या नसून याच गावात आपल्याला सर्वात जास्त लीड मिळाले होते असे खा. सुजय विखे यांनी विशद करताच म्हणून त्या गावावर ही वेळ आली काय असा प्रश्न उपस्थितानी विचारला असता, तुम्ही याचा कसा ही अर्थ लावा असे खा. विखे म्हणाले.
  

आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता त्याच्यावर टीका करताना केंद्र शासनाकडे मी पाठपुरावा करून रस्त्यासाठी निधी आणला मात्र त्याचे श्रेय काही लोकप्रतिनिधी लाटत असल्यामुळे मला यात लक्ष घालावे व लागत आहे असे खा विखे यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment