आयपीएस प्रतिक ठुबे यांचे रविवारी व्याख्यान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 9, 2021

आयपीएस प्रतिक ठुबे यांचे रविवारी व्याख्यान

 आयपीएस प्रतिक ठुबे यांचे रविवारी व्याख्यान


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर जिल्हा मराठा सेवा संघ व अहमदनगर जिल्हा मराठा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आयपीएस अधिकारी इंजि. प्रतीक विजयकुमार ठुबे यांचे व्याख्यान आयोजित केले असल्याची माहिती मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेशराव इथापे यांनी दिली.
रविवार दिनांक 11 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता झूम मीटिंगच्या माध्यमातून युवक आणि करियर या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. प्रतिक ठुबे हे स्वतः आयपीएस असून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन मध्ये बॅचलर ऑफ इंजीनियरिंग ही पदवी घेतली आहे त्यानंतर आपण आयपीएस व्हावे हा ध्यास घेऊन त्यांनी यूपीएससीच्या परीक्षा दिल्या आणि 2013 पासून ते   पोलीस अधीक्षक म्हणून आसाम राज्यात नोकरीत आहेत सध्या राज्यातील कोक्राझार येथे सेवेत आहेत.  त्यांनी आत्तापर्यंत गुवाहाटी, धुब्री, दिब्रुगड बक्षा येथे पोलीस अधीक्षक पदावर नोकरी केली आहे. पोलिस दलातील उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना आत्तापर्यंत दहा वेळा आसाम राज्याने गौरवले आहे  ते  उत्कृष्ट अधिकारी व उत्तम वक्ते असून या परिस्थितीत युवकांना योग्य दिशा मिळावी मार्गदर्शन व्हावे व लोकसेवा आयोग, यु पी एस सी आणि इतर स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन व्हावे यासाठी ते मार्गदर्शन करणार आहेत. मिटींग  जाईन होणे संदर्भात पतसंस्थेचे व्यवस्थापक अशोक वारकड 94 20 80 24 81 यांच्याशी संपर्क साधावा व व्याख्यान ऐकण्यासाठी सर्व पालक व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेशराव इथापे, मराठा पतसंस्थेचे उपाध्यक्ष सतीश इंगळे, प्रकल्पप्रमुख व संचालक किशोर मरकड यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment