विकेंड लॉकडाऊन उघडणे व दुकानाच्या वेळा वाढविण्याबाबत व्यापारी असो.च्या वतीने आमदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, July 9, 2021

विकेंड लॉकडाऊन उघडणे व दुकानाच्या वेळा वाढविण्याबाबत व्यापारी असो.च्या वतीने आमदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

 विकेंड लॉकडाऊन उघडणे व दुकानाच्या वेळा वाढविण्याबाबत व्यापारी असो.च्या वतीने आमदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः आज शुक्रवार जुलै रोजी महात्मा गांधी रोड व्यापारी असोसिएशन यांच्या वतीने आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना महाराष्ट्रातील दुकानाच्या वेळ आणि आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवारी आणि रविवारी लावलेल्या विकेंड लॉकडाऊन उघडण्याबाबत निवेदन देण्यात आले.
सकाळी 7.00 ते संध्याकाळी 4.00 ही वेळ ग्राहकांना आणि दुकानदारांनाही गैरसोयीचे वाटते एकतर सकाळी 9.00 ते संध्याकाळी 6.00 किंवा सकाळी 10.00 ते संध्याकाळी 7.00 पर्यंत ही वेळ करण्यात यावी कारण ग्राहकवर्ग हा सकाळी 10.00 वाजल्यानंतर दुकानात येतात; तसेच कामकाजाचे तास वाढल्यास एकाच वेळेस गर्दी न होता दुकाने बंद करण्याच्या शेवटी गर्दी होणार नाही तसेच सायंकाळी 7.00 वाजता दुकान बंद करण्याची वेळ दिली तर बहुतेक दुकानदार विदेशी देशांप्रमाणे हे धोरण कायमस्वरूपी अमलात आणतील!
अर्थव्यवस्थे बाबत बोलले तर पहिल्या आणि दुसर्‍या लॉकडाऊन नंतर व्यवसाय चांगल्या प्रमाणात होत होता, परंतु सरकारने वेळ कमी करून अर्थव्यवस्थेला ब्रेक लावले; लोकांना झालेले नुकसान भरपाईसाठी संधी भेटली होती पण तिही गेली, कृपया आमच्या सर्व मुद्द्यांच्या काळजीपूर्वक विचार करा आणि लवकरात लवकर सकाळी 9.00 ते संध्याकाळी 6.00 किंवा सकाळी 10.00 ते संध्याकाळी 7.00 या वेळेत दुकान उघडण्यासाठी परवानगी द्यावी व त्वरित शनिवार व रविवारचा विकएण्ड लॉक डाऊन रद्द करावा, ही विनंती या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी महात्मा गांधी व्यापारी असोसिएशनचे सेक्रेटरी किरण वोरा, अध्यक्ष शामराव हरिभाऊ देडगांवकर, विक्रम मुथ्था, परमशेठ पोखरणा, कमलेश आहुजा, सुशील येवलेकर, भालचंद्र रायसिंगानी, संजय भंडारी, राजेय तिवारी, दिपकशेठ नवलानी, संदीप गांधी इत्यादी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here