नागेश विद्यालयात सुनंदाताई पवार यांच्या हस्ते मोफत वृक्षवाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, July 1, 2021

नागेश विद्यालयात सुनंदाताई पवार यांच्या हस्ते मोफत वृक्षवाटप

 नागेश विद्यालयात सुनंदाताई पवार यांच्या हस्ते मोफत वृक्षवाटप


नगरी दवंडी/प्रतिनिधी
जामखेड ः  आदरणीय आमदार रोहित दादा पवार आणि कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने समृद्ध गाव संकल्प 2021-22 अंतर्गत समृद्ध गाव मध्ये सहभागी असलेल्या व 20 गावांना मोफत वृक्ष वाटप आदरणीय सुनंदाताई पवार यांच्या हस्ते नागेश विद्यालय जामखेड येथे करण्यात आले. यामध्ये बकुळ, कांचन, अर्जुन, वड, पिंपळ, यासारखी देशी व पर्यावरण पूरक झाडांचा समावेश आहे.
मागील दोन वर्षापासून कर्जत जामाखेड एकात्मिक विकास संस्था, आमदार रोहित दादा पवार सुनंदाताई पवार यांच्या मार्फत कर्जत जामखेड मध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत, कर्जत व जामखेड तालुक्यातील प्रत्येकी वीस गावात समृद्ध गाव संकल्प यावर काम चालू असून यातील पहिला टप्पा प्रशिक्षण व त्यानंतर लोकसहभागातून जलसंधारण ची कामे या पद्धतीने काम चालू आहे. पावसाळ्याच्या तोंडावर विविध ग्रामपंचायतीने देशी व पर्यावरणपूरक झाडांची मागणी केल्यावर साधारण 4 ते 5 फूट उंचीची झाडे गावांना दिली दिली जाणार आहेत, ग्रामस्थ व ग्रामपंचायत या वृक्षाची संगोपन व संवर्धन करणे गरजेचे असून मार्फत दर तीन महिन्यांनी याचा फॉलोअप घेतला जाणार आहे, येणार्‍या काळात समृद्ध गाव मध्ये सात स्तंभावर काम करत असताना अध्यात्मिक समृद्धी, जल आणि कृषी समृद्धी, स्वच्छता समृद्धी, आरोग्य व शिक्षण समृद्धी, महिला व बाल विकास समृद्धी, ग्रामीण मूलभूत सुविधा व नाविन्यपूर्ण बाबी या गोष्टीवर समृद्ध गाव मध्ये काम होणार आहे
याप्रसंगी बोलत असताना सुनंदाताई पवार म्हणाल्या तुम्ही एक पाऊल पुढे टाका आम्ही दोन पाऊल पुढे टाकू एकमेकांच्या साथीने विकास करू आपण साथ दिली तरच विकास हा नक्कीच मोठी झेप घेईल आणि गाव व शेतकरी समृद्ध होईल असे प्रतिपादन आदरणीय सुनंदाताई यांनी केले या कार्यक्रमाप्रसंगी नागेश विद्यालयाचे मुख्याध्यापक मडके सर सर्व शिक्षक स्टाफ गावा मधून आलेले गावचे प्रतिनिधी, सरपंच, सदस्य, जलयोद्धे आणि सामाजिक संघटना यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here