बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी ः दौंड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 1, 2021

बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी ः दौंड

 बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी ः दौंड


नगरी दवंडी/प्रतिनिधी
खरवंडी कासार ः  येळी कृषी विभागामार्फत येळी येथे तालुका कृषी अधिकारी प्रवीण भोर  व कृषी अधिकारी रामदास मडके यांचे मार्गदर्शनाखाली तूर या पिकाविषयी शेतीशाळा आयोजीत केली होती, यावेळी ज्ञानेश्वर दौंड कृषी सहाय्यक. यांच्या सहकार्यासोबत पाथर्डी तालुक्यात गावोगावी शेतकर्याना बीज प्रक्रिया कशी करायची  या संदर्भात शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले त्यावेळी ते बोलत होते, बीजप्रक्रिया करतांना सुरुवातीला रासायनिक बीजप्रक्रिया करावी त्यानंतर जैविक बीजप्रक्रिया करून पेरणी करावी, बीजप्रक्रिया कशी करावी याचे प्रात्यक्षिक यावेळी शेतकर्‍यांना करुन दाखविणेत आले, बीजप्रक्रिया केल्यामुळे कीड व रोगापासून बियाण्याचे संरक्षण होते, बुरशी लागत नाही, उगवणक्षमता वाढते, व उत्पंनात वाढ होते, यावेळी प्रकाश गायके , कृषी सहाय्यक यांनी प्रास्ताविक करुन आभार मानले.

No comments:

Post a Comment