राणे, पाटील, कराड यांचं केंद्रीय मंत्रीपद निश्चित. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 7, 2021

राणे, पाटील, कराड यांचं केंद्रीय मंत्रीपद निश्चित.

 राणे, पाटील, कराड यांचं केंद्रीय मंत्रीपद निश्चित.

आज संध्याकाळी मोदी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार.


नवी दिल्ली -
आक्रमक चेहरा म्हणून परिचित असणारे खासदार नारायण राणे भिवंडीचे खासदार कपिल पाटील राज्यसभेचे खासदार भागवत कराड या तीन खासदारांचा आज सायंकाळी होणार्‍या केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्याचे जवळजवळ निश्चित झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी हे तीनही नेते दाखल झाले आहेत.
 मोदींच्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्रातले तीन नेते पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. नारायण राणे, कपिल पाटील आणि भागवत कराड हे मोदींच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. विस्तारात यांची नावे जवळपास निश्चित झाल्याचे समजते. भाजपचे संघटन महामंत्री बीएल संतोष यांच्या उपस्थितीत 7, लोक कल्याण मार्ग वर महत्वपूर्ण चर्चा सुरु आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहाही उपस्थित आहेत.
नारायण राणे हे आक्रमक नेते आणि मराठा समाजातील चेहरा म्हणून ओळख आहे. आरक्षणाचा मुद्दा राणेंच्या माध्यमातून तापवण्याचा प्रयत्न असू शकतो. तसंच, अलीकडेच शिवसेना-भाजप एकत्र येणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, नारायण राणे यांचा शिवसेना आणि मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी जुना संघर्ष आहे. त्यामुळे राणेंच्या माध्यमातून शिवसेनेला जेरीस आणण्याचा प्रयत्न आहे. याशिवाय, कोकणात भाजपची ताकद वाढवण्यास मदत होईल. शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बुलंद आवाज भाजपला मिळेल. तसंच, मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला शह देण्यासाठी उपयोग होऊ शकतो.
खासदार कपिल पाटील 2014 आधी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झाले. देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे उत्तम संबंध आहेत. कपिल पाटील आगरी समाजातून येतात. ओबीसी चेहरा असल्यानं पक्षाला फायदा होईल. कपिल पाटलांच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला शह देण्यासाठी उपयोग होऊ शकतो. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी अडचणीत असताना कपिल पाटलांनना पद देणं सूचक कृती आहे.

No comments:

Post a Comment