वरिष्ठांचा जाच.. डॉक्टरची लसीकरण केंद्रात आत्महत्या. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 7, 2021

वरिष्ठांचा जाच.. डॉक्टरची लसीकरण केंद्रात आत्महत्या.

 वरिष्ठांचा जाच.. डॉक्टरची लसीकरण केंद्रात आत्महत्या.

संबंधितांवर कार्यवाहीची ओबीसी, व्हीजेएनटी जनमोर्चाची मागणी.

डॉ गणेश शेळके यांचे सुसाईड नोटमध्ये ज्या अधिकार्‍यांची नावे लिहिले आहेत त्या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चा च्या वतीने करण्यात आली आहे. काल रात्री 9.30 च्या सुमारास जनमोर्चाचे श्री.भिंगारे आणि पदाधिकारी सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपस्थित राहून डॉ.शेळके यांच्या कुटूंबियांना धीर दिला. या प्रकरणी दोषींना अटक करावी, अशी मागणी उपअधिक्षक सुदर्शन मुंडे यांच्याकडे जनमोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी केली आहे. राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांना या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यात आली. त्यामुळे पोलिस प्रशासन रात्री उशिरापर्यंत संबंधित कुटूंबियांचा जबाब नोंदवून घेत होते. रात्री 1 वा. डॉ.शेळके यांचे शव घाटी (औरंगांबाद) येथे पोस्टमार्टमसाठी पाठवून देण्यात आले आहे.


पाथर्डी -
तहसीलदार, कलेक्टर, आरोग्य अधिकारी या प्रशासनातील वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. अशी सुसाईड नोट लिहून पाथर्डीतील डॉ. गणेश शेळके यांनी लसीकरण केंद्रातच आत्महत्या केल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली असून प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी खालच्या कनिष्ठ अधिकार्‍यांना त्रास देण्याचा विषय ऐरणीवर आला आहे.
पाथर्डी तालुक्यातील करंजी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथील प्रमुख डॉ. गणेश शेळके यांनी उपकेंद्रातच छताच्या पंख्याच्या हुकाला गळफास घेत आत्महत्या केली. डॉ. शेळके ड्युटीवर आले. त्यानंतर काही वेळाने त्यांना तिसगाव येथे बोलावण्यात आले होते. यामुळे ते तिसगाव येथे गेले होते. तेथून परत करंजी उपकेंद्रात आले असता ते तणावाखाली असल्याचे उपस्थितांनी सांगितले. यावेळी सहकारी कर्मचार्यांनी डॉ. शेळके यांना धीर देत ताणतणाव घेऊ नका, नोकरीमध्ये असे चालुच असते, असे सांगत डॉ. शेळके यांचा ताण कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर डॉ. शेळके कागद व पेन घेत टॅब जमा करा. मी राजीनामा देणार असल्याचे सांगत दालनात गेले. त्यांनी आतून दरवाजा लावून घेतला. त्यानंतर दोन लसीकरण केल्यानंतर नर्सने जेवनासाठी डॉ. शेळके यांना आवाज दिला. मात्र आतुन आवाज येत नाही म्हणुन दरवाजा वाजवला. पण आतुन कोणताही आवाज आला नाही. म्हणुन फोन लावला तर फोनही उचलला नाही म्हणुन सर्व नर्स सेविकांनी खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला व खिडकीतुन पाहीले तर डॉ. शेळके यांनी छताच्या पंख्याच्या हुकाला दोरी लावुन गळफास घेतल्याचे दिसून आले.
मी डॉ. गणेश गोवर्धन शेळके आत्महत्या करत आहे. यास कारणीभूत तालुका वैद्यकिय अधिकारी भगवान दराडे व प्रशासकीय सेवेतील तहसीलदार व कलेक्टर जबाबदार. वेळेत पेमेंट न करणे, कामाचा अतिरीक्त भार व पेमेंट कपातीची धमकी देणे, या कारणास्तव मी आत्महत्या करत आहे. अशी सुसाईड नोट लिहून त्याखाली सही देखील केली आहे.
अशी सुसाईट नोट सापडली असून त्यामध्ये वरीष्ठ अधिकार्यांची नावे असल्याने आरोग्य विभाग व प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. डॉ. गणेश शेळके यांचे पार्थिव उच्यस्तरीय तपासणीसाठी पाथर्डी येथे नेण्यात आले आहे. या प्रकारणी गुन्हा नोंदवण्यात येत असुन पो. कॉ. सतीश खोमने व अरविंद चव्हाण, भाउसाहेब तांबे व सपोनि कौशल्य निरंजन वाघ हे अधिक तपास करत आहेत.
घटना घडल्यानंतर दुपारीच डॉ.शेळके यांचे शव नगरच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आले होते. 12 तासानंतर ते घाटीला पाठविण्यात आले. मृत्यूनंतर ही मृतदेहाची हेटाळली झाली. यांचे गांभीर्य कोणाच्या लक्षात आले नाही, असा गोंधळ रुग्णालयच्या दारात पहायला मिळाला. या प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेऊन ओबीसी जनमोर्चाच्या पदाधिकार्यांनी तात्काळ रुग्णालयाकडे धाव घेतली. त्यात शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनिल भिंगारे, उपाध्यक्ष रमेश सानप, नईम शेख आदिंनी सिव्हील हॉस्पिटलमध्ये येऊन डॉ.शेळके कुटूंबियांशी व पोलिस प्रशासनाशी चर्चा केली. या प्रकरणी जनमोर्चा लक्ष ठेवून असून मयत शेळके सारख्या उमद्या डॉक्टर आत्महत्येपर्यंत येतो, त्यामागे वरिष्ठांचा जाच कसा असेल? याची दखल घेण्याची गरज आहे, असे यावेळी श्री.रमेश सानप यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment