पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांचे निलंबन मागे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, July 7, 2021

पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांचे निलंबन मागे.

 पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांचे निलंबन मागे.

बहुचर्चित बनावट डिझेल प्रकरण..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः बनावट डिझेल प्रकरणाचा जिल्ह्यातील पोलिस वर्तुळात चर्चेचा विषय झाला होता. बनावट डिझेल प्रकरण तपासाशी संबंधित पोलिस अधिकारी व अन्य 11 जणांचे निलंबन व खातेनिहाय चौकश कारवाईच्या अधीन राहून तात्पुरत्या स्वरूपात मागे घेण्यात आल्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिले. असल्याने या पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.
बनावट डिझेल प्रकरणात कारवाई करून गुन्हा दाखल करण्यास विलंब तसेच तडजोडीचा प्रयत्न केल्याप्रकरणी तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड यांच्या पथकातील एका अधिकार्यासह सात कर्मचार्यांचे निलंबन करण्यात आले होते. आता त्या कर्मचार्यांची निलंबनातून मुक्तता करण्यात आली असून त्यांना विविध पोलिस ठाण्यात नेमले आहे. तसेच इतर कारणातून निलंबित तीन कर्मचार्यांची देखील निलंबनातून मुक्तता करण्यात आली आहे.
तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड यांच्या विशेष पथकाने 26 ऑक्टोबर रोजी भिंगार पोलीस स्टेशन हद्दीतील जीपीओ चौकात बनावट डिझेल साठ्यावर छापा टाकला होता. याप्रकरणात काही आरोपींना अटक देखील झाली. त्यावेळी दुपारी झालेल्या कारवाईचा गुन्हा रात्री उशिरापर्यत दाखल न झाल्याने अपर पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड यांच्यासह कर्मचार्यांचे निलंबन करण्यात आले होते. दत्ताराम राठोड यांची बदली करून त्यांना अमरावती येथे नागरी हक्क संरक्षण पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. बनावट डिझेल प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांना दिले होते. मदने यांनी पोलीस अधीक्षकांना अहवाल सादर केल्यानंतर राठोड यांच्या पथकातील एका अधिकार्यासह सात पोलिस कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. बनावट डिझेल प्रकरणात गुन्हा दाखल करताना विलंब तसेच तडजोडीचा प्रयत्न करण्यात येऊन कागदपत्रांमध्ये जाणीवपूर्वक त्रुटी ठेवल्याचा ठपका ठेवत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पोलिस उपनिरीक्षक सुनील सूर्यवंशी, पोहेकॉ. भरत डोंगरे, पोहेकॉ. गणेश डहाळे, पोहेकॉ. राजाराम शेंडगे, पोना. अरविंद भिंगारदिवे, पोना. अजित घुले, पोना. संदीप धामणे, पोकॉ. विनोद पवार यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. त्यांची निलंबनातून मुक्तता करतानाच वेगवेगळ्या कारणांमुळे निलंबित झालेले पोलिस मुख्यालयातील पोना. राजू चव्हाण, पोहेकॉ. शंकर रोकडे व अकोले पोलिस ठाण्यातील प्रविण अंधारे यांच्यावरील कारवाई मागे घेत त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here