वाहिरा गावात घातला पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 17, 2021

वाहिरा गावात घातला पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ

 वाहिरा गावात घातला पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ

मैनीनाथ झांजे गंभीर जखमी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
आष्टी ः
तालुक्यातील वाहिरा येथे घातला पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ, गावातील मैनीनाथ झांजे, केसरबाई आटोळे  मा.सरपंच , प्रतिभा झांजे , यांना कुत्र्याने चावा घेऊन गंभीर जखमी केले.
मैनीनाथ झांजे हे रात्री दहाच्या सुमारास घराच्या बाहेरील पढवीमध्ये झोपले असताना अचानक पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांच्यावरती त्यांच्या तोंडाला खूप मोठा चावा घेतला. कुत्र्याने चावा घेतल्यावर ते ओरडले त्यानंतर त्याला मारण्यासाठी त्यांच्या सूनबाई प्रतिभा झांजे या बाहेर आल्या असताना कुत्र्याने त्यांच्यावर सुद्धा चावा घेतला. केसरबाई आटोळे यांच्यावर सुद्धा चावा घेऊन पूर्ण गावात धुमाकूळ घातला जनावरांना चावा घेतला.
सकाळी  मैनीनाथ झांजे, केशरबाई आटोळे, प्रतिभा झांजे ,यांना आष्टी येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले असताना ते खूप जखमी असल्यामुळे त्यांना आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेता आला नाही त्यामुळे त्यांना अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये  उपच्यारा साठी नेण्यात आले.

No comments:

Post a Comment