यशवंत गाडे विद्यालयाचा शंभर टक्के निकाल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 19, 2021

यशवंत गाडे विद्यालयाचा शंभर टक्के निकाल

 यशवंत गाडे विद्यालयाचा शंभर टक्के निकाल

नगरी दवंडी / प्रतिनिधी 
अहमदनगर  : फकिरवाडा मुकुंदनगर येथील यशवंत गाडे विद्यालयाचा सलग तिसऱ्या वेळेस शंभर टक्के निकाल लागला .विद्यालयातुन १११ विद्यार्थी परिक्षेस बसले होते . त्यातील ६ विद्यार्थी विशेष योग्यता तर २१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले .आरती वाकरे ८५ टक्के गुण मिळवत प्रथक क्रमांक , अल्फैज कदीर शेखने ८३ टक्के गुण मिळवत दुसरा तर वैभव निमसे याने ८२ टक्के गुण मिळवत तिसरा क्रमांक मिळवला . यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत गाडे , सचिव प्रा . शशिकांत गाडे , खजिनदार संजय गाडे , सहसचिव रमाकांत गाडे , उपाध्यक्ष एम.पी.कचरे , मुख्याध्यापक बाळासाहेब गाडेकर यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment