शिक्षण, आरोग्य, कृषी, पर्यावरण क्षेत्रांत रोटरीचे योगदान कौतुकास्पद : आ.संग्राम जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 19, 2021

शिक्षण, आरोग्य, कृषी, पर्यावरण क्षेत्रांत रोटरीचे योगदान कौतुकास्पद : आ.संग्राम जगताप

 शिक्षण, आरोग्य, कृषी, पर्यावरण क्षेत्रांत रोटरीचे योगदान कौतुकास्पद : आ.संग्राम जगताप


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः आंतरराष्ट्रीय स्तरावर सामाजिक कार्यासाठी नावाजल्या जाणार्या रोटरीचे नगर जिल्ह्यात तसेच शहरातही मोठे कार्य उभे राहिले आहे. शासन, प्रशासनाच्या जोडीने अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांत रोटरीचा सहभाग असतो. सामाजिक जाणीवा असलेली मंडळी रोटरीत सक्रिय आहेत. शिक्षण, आरोग्य, कृषी, पर्यावरण अशा अनेक क्षेत्रात रोटरी देत असलेले योगदान कौतुकास्पद आहे. करोना महामारीच्या काळात नगर शहरात रोटरी परिवाराने अनेक चांगले उपक्रम राबवून करोना रूग्णांना दिलासा देण्याचे काम केले आहे. रोटरी सेंट्रलचे नूतन अध्यक्ष ईश्वर बोरा व त्यांची टिम येत्या काळात आणखी व्यापक समाजकार्य करेल, असा विश्वास आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केला.
रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलचे नूतन अध्यक्ष ईश्वर बोरा, सेके्रटरी डॉ.दिलीप बागल यांच्यासह नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा नुकताच रोटरीचे 2022 - 23 चे नियुक्त प्रांतपाल रूक्मेश जखोटिया यांच्या हस्ते तर आ.जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी ते बोलत होते. उप प्रांतपाल दादासाहेब करंजुले, माजी प्रांतपाल शिरीष रायते, माजी प्रांतपाल प्रमोद पारीख, उप प्रांतपाल मनिष नय्यर, माजी उप प्रांतपाल अभय राजे व मनिष बोरा, रोटरी सेंट्रलचे मावळते अध्यक्ष प्रसन्न खाजगीवाले, प्रथम महिला मिनल बोरा, रोटरीच्या विविध क्लबचे पदाधिकारी प्रशांत बोगावत, किरण कालरा, शशी झंवर, सुयोग झंवर, सुवर्णा बरमेचा, प्रगती गांधी, पुरुषोत्तम जाधव, कल्पना गांधी, देविका रेळे,कल्पना मुथा, सोनल फिरोदिया यांच्यासह रोटरी व इनरव्हिलचे सभासद उपस्थित होते.
प्रारंभी सुंदर गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर राष्ट्रगीत गायन झाले. नूतन अध्यक्ष ईश्वर बोरा यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेणारी तसेच रोटरी सेंट्रलच्या मागील वर्षीच्या कामकाजाचा आढावा घेणारी चित्रफित यावेळी दाखविण्यात आली.
रूक्मेश जखोटिया म्हणाले की, रोटरी परिवार हा जगभरात कार्यरत आहे. भारतातही रोटरीचा मोठा पसारा असून समाज उन्नतीच्या समान ध्येयाने रोटरियन्स तनमनधनाने योगदान देत असतात. नगरमधील रोटरी सेंट्रलच्या टिमने मागील वर्षभरात उल्लेखनीय काम करून इतिहास घडवला आहे. आताचे नूतन अध्यक्ष ईश्वर बोरा हे प्रचंड धडाडी असलेले असून त्यांच्या हातूनही ऐतिहासिक काम होईल. शिक्षण, आरोग्य, सांस्कृतिक, पर्यावरण अशा सर्वच क्षेत्रात रोटरी परिवार महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले.
नूतन अध्यक्ष ईश्वर बोरा म्हणाले की, सामाजिक कार्याचा घरातूनच मिळालेला वारसा घेऊन मी काम करीत आहे. रोटरी परिवाराचा सदस्य असणे हे माझ्यासाठी कायम अभिमानाची बाब आहे. आता अध्यक्षपदाची धुरा माझ्या खांद्यावर सोपवून सर्वांनी मोठा विश्वास दाखविला आहे.

No comments:

Post a Comment