जनशिक्षण संस्थानतर्फे 15 ते 30 जुलैदरम्यान स्वच्छता पंधरवडा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 19, 2021

जनशिक्षण संस्थानतर्फे 15 ते 30 जुलैदरम्यान स्वच्छता पंधरवडा

 जनशिक्षण संस्थानतर्फे 15 ते 30 जुलैदरम्यान स्वच्छता पंधरवडा

महिला सक्षमीकरणाची गरज-आ.संग्राम जगताप


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः भारत सरकारचा कौशल्य विकास कार्यक्रम हा अत्यन्त उत्कृष्ट व फायदेशीर आहे.जनशिक्षण संस्था हि सेवाभावी संस्था अनेक वर्षांपासून उत्तम कार्य करीत आहे.जनशिक्षण संस्थेमुळे महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास व  व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी.सॅनिटायझरने हात धुवावे,मास्कचा वापर करावा,सोशिअल  डिस्टन्स पाळावे.येथे महिलांसाठी विविध कोर्सचे प्रशिक्षण दिले जाते व मार्गदर्शन केले जाते.कुटुंबाला आधार देण्यासाठी महिला सक्षमीकरणाची गरज आहे.असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले आहे.    
दातरंगेमळा येथील जनशिक्षण संस्थान तर्फे 15 जुलै ते 30 जुलै स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात येतो.याप्रसंगी आ.संग्राम जगताप बोलत होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी शिवणकाम व ब्युटीपार्लर कोर्सच्या विद्यार्थिनींनाआ.संग्राम जगताप यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते,नगरसेवक प्रकाश भागानगरे,पारनेरचे नेते बाळासाहेब जगताप,प्रा.अरविंद शिंदे,जनशिक्षण संस्थानचे डायरेक्टर बाळासाहेब पवार,कार्यक्रम सल्लागार समिती सदस्य  सौ.कमल पवार,कार्यक्रम अधिकारी शफाकत सय्यद,सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सौ कुंदा शिंदे, अकाउंटंट अनिल तांदळे,उषा देठे,विजय बर्वे आदी उपस्तिथ होते.                                                      
 प्रास्तविकात जनशिक्षण संस्थानचे डायरेक्टर बाळासाहेब पवार म्हणाले कि,कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय नवी दिल्ली यांच्यावतीने 15 जुलै ते 30 जुलै स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत आहे.यात वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता,कोविड विषयी जनजागृती,घोष वाक्य स्पर्धा,मास्क स्पर्धा, गांडूळ खत मार्गदर्शन,वृक्षारोपण व श्रमदान असे उपक्रम राबविले जाणार आहे.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे युवा कौशल्य दिनानिमित्त प्रत्येक हाताला काम दिले जाणार आहे.असे सांगितले भारत सरकारने महिलांना जनशिक्षण संस्थान मार्फत प्रशिक्षणाची संधी निर्माण केली आहे.25 महिलेचा गट तयार असल्यास जागेवर जाऊन प्रशिक्षण दिले जाते.कोर्स पूर्ण झाल्यावर भारत सरकारचे प्रमाणपत्र दिले जाते.देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष पूर्ण झाले म्हणून आजादीका अमृत महोस्तव वर्षभर साजरा केला जात आहे. जनशिक्षण संस्थानतर्फे 75000 राख्या बनवून जे बांधव सीमेवर आपले रक्षण करीत आहेत.त्यांना राख्या बांधण्यासाठी पाठवीत आहोत. गोवा, दादर नगरहवेली व महाराष्ट्र असा हा उपक्रम राबविला जाणार आहे.

No comments:

Post a Comment