लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवा मंचच्यावतीने अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनी युवकांना मास्कचे वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 19, 2021

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवा मंचच्यावतीने अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनी युवकांना मास्कचे वाटप

 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवा मंचच्यावतीने अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनी युवकांना मास्कचे वाटप


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवा मंचच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त सिध्दार्थनगर येथील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन कोरोनाच्या सुरक्षिततेसाठी मास्कचे वाटप करण्यात आले.
यावेळी मंचचे संस्थापक अध्यक्ष अंतोन गायकवाड, राजू काळूंखे, लखन घोरपडे, अविनाश काते, रवी भोसले, संतोष पवार, राहुल अल्हाट, रवी काते, बेटू  रोकडे, शंकर नेटके, अनिकेत खंडागळे आदी उपस्थित होते.
अंतोन गायकवाड म्हणाले की, समाज जागृतीची ज्योत अण्णाभाऊंनी आपल्या शाहिरीतून पेटवली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णाभाऊंचे कार्य महत्त्वाचे आहे. अण्णाभाऊ साठे आंबेडकरवादी विचारांचे होते. लोककलेच्या माध्यमातून त्यांनी समाज जागृतीचे कार्य केले. वंचितांचे प्रश्न मांडून, त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेच्या न्याय हक्कासाठी लढा दिला. त्यांचे विचार व कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.राजू काळूंखे यांनी कोरोनाचे संक्रमण वाढत असताना तीसरी लाट निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येकाने काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment