विवाहितेस विवाहासाठी ब्लॅकमेलिंग - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 10, 2021

विवाहितेस विवाहासाठी ब्लॅकमेलिंग

 विवाहितेस विवाहासाठी ब्लॅकमेलिंग

‘अभिनव’ चे अपहरण करणारा ‘सागर’ गजाआड.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
औरंगाबाद येथील एका विवाहितेचा “तू माझ्याबरोबर विवाह कर अन्यथा तुझ्या मुलास पळवून नेईल”अशी धमकी देवून 6 वर्षाच्या ‘अभिनव’ याचे स्विफ्ट डिझायर गाडीतून अपहरण करणार्‍या सागर आळेकर रा. आळकर मळा, श्रीगोंदा वय 27 वर्ष यास ‘अभिनव’सह नगर-दौंड रस्त्यावरील पारगाव फाटा येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेवून औरंगाबाद पोलिसांचे स्वाधीन केले आहे.
सदर घटनेची हकीकत अशी की, काल रोजी औरंगाबाद येथिल बजाज नगर मध्ये राहणारे परशुराम नवनाथ रासकर वय 36 वर्षे , यांचे नातेवाईकांनी पोलीस निरीक्षक रामराव ढिकले श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांना माहीती दिली की , परशुराम रासकर यांचा सहा वर्षांचा मुलगा अभिनव यास सागर आळेकर रा.श्रीगोंदा याने परशुराम रासकर याची पत्नी हीचेसोबत प्रेम संबध असल्याने तु माझे सोबत लग्न कर नाहीतर तुझ्या मुलास पळवून नेईल असे म्हणुन अभिनव यास त्याचे कडील स्विफ्ट डिझायर गाडी (नं.एम.एच .42 ए.एच .9655) मध्ये किडनॅप करुन श्रीगोंद्याकडे येत आहे . थोड्याच वेळापुर्वी अहमदनगर कायनेटिक चौकातुन दौंड रोडने गेला आहे
पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना ही माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना नगर दौड रोडवर पारगाव फाटा येथे नाकाबंदी करण्याचे आदेश देवुन तात्काळ रवाना केले.नाकाबंदी दरम्यान सायंकाळी 06 वा.चे.सुमारास मिळालेल्या माहीती मधील स्विफ्ट डीझायर गाडी क्रमांक.एम.एच .42 ए.एच .9655 ही अहमदनगर कडुन दौंड कडे जाताना दिसल्याने ती थांबवुन त्यातुन आरोपी सागर गोरख आळेकर वय 27 वर्षे , रा.आळेकरमळा , श्रीगोंदा ता.श्रीगोंदा यास त्याने पळवुन आणलेल्या 06 वर्षाच्या अभिनव रासकर सह ताब्यात घेतले.मुलास त्याचे आईवडीलांच्या ताब्यात दिले आहे.
आरोपीस पुढील कारवाईसाठी फिर्यादी परशुराम रासकर यांचे फिर्यादीवरुन एम.आय.डी.सी.वाळंज, औरंगाबाद शहर पोस्टे मध्ये दाखल गुन्ह्यात एम.आय.डी.सी.वाळुज, औरंगाबाद शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील साहेब, मा.अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले सपोनि दिलीप तेजनकर, सफो रमेश जाधव, अंकुश ढवळे, प्रकाश मांडगे, किरण बोराडे, दादा टाके, गोकुळ इंगवले, यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment