चांदबिबी महाल परिसरात 100 औषधी वृक्षांची लागवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, June 10, 2021

चांदबिबी महाल परिसरात 100 औषधी वृक्षांची लागवड

 चांदबिबी महाल परिसरात 100 औषधी वृक्षांची लागवड

ओपन आर्म्स संघटनेच्या युवकांनी वृक्ष रोपन व संवर्धनाचा केला संकल्प


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः वृक्ष आणि वन याच महत्व संत तुकाराम महाराजांनी चारशे वर्षापूर्वी त्यांच्या ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या अभंगाच्या माध्यमातून सांगीतले आहे. त्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावून त्याच्या संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे,ग्लोबल वार्मिंगच्या समस्यांवर पर्यावरण संवर्धन हा एकमेव पर्याय असून यापुढील भावी पिढ्या व सजीव सृष्टीच्या रक्षणासाठी व पावसासाठी वृक्षारोपन व संवर्धन अत्यावश्यक असून .या उपक्रमात सर्व नागरकरांचा सहभाग अत्यंत महत्वाचा असून हे वृक्षरोपण व पर्यावरण संवर्धनाची मोठी लोकचळवळ ठरेल असे प्रतिपादन संघटनेचे अध्यक्ष शुभम जाधव यांनी व्यक्त केले.
ओपन आर्म्स संघटनेच्या पुढाकारातून नगर शहरामध्ये 1 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केला होता त्यानुसार नागरिकांच्या सहकार्याने लागवड व संवर्धन सुरू केले आहे.त्याचाच एक भाग म्हणून ऐतिहासिक वास्तूच्या सभोवताली वृक्षा असावे यासाठी चांदबीबी महल परिसरामध्ये 100 औषधे वृक्षारोपणाच्या लागवडीचा शुभारंभ संघटनेच्या अध्यक्ष शुभम जाधव यांच्या हस्ते वृक्षलागवड करून संपन्न यावेळी समवेत उपअध्यक्ष कृष्णा सरोदे, खजिनदार परेश मुनोत, गणेश शिंदे, आकाश खेड़कड, शुभम गुळसकर, मयूर राऊत, सलमान जावेद शेख, पंकज हरबा, प्रतीक नानेकर आदी संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here