कोरोना संकट काळात आ.संग्राम जगताप यांचे महत्त्वपूर्ण योगदान- कुंदन ऋषीजी म.सा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 10, 2021

कोरोना संकट काळात आ.संग्राम जगताप यांचे महत्त्वपूर्ण योगदान- कुंदन ऋषीजी म.सा.

 कोरोना संकट काळात आ.संग्राम जगताप यांचे महत्त्वपूर्ण योगदान- कुंदन ऋषीजी म.सा.

आनंदधाम येथील साधु-साध्वीनां प्रतिबंधक लसीकरण देण्यास सुरुवा


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः गेल्या दीड वर्षापासून मानवी जीवनावर कोरोना विषाणूचे महाभयंकर संकट ओढवले आहे.यासंकटावर मात करण्यासाठी कोरोना रोगप्रतिबंधक लसीकरणायाची खरी गरज आहे आमदार संग्राम जगताप यांनी कोरोना संकट काळामध्ये आपली जबाबदारी सक्षम पणे पार पडली, नागरिकांसाठी अहोरात्र झटले कोरोणाच्या अतिसंवेदनशील रुग्णांना उपचारासाठी मदत करत होते.कोविड रुग्णांना औषधे, बेड, उपलब्ध करून देत आहे. नगर शहरामध्ये कोरोना रुग्णांसाठी देवदूत ठरले आहेत असे उदगार कुंदन ऋषीजी म.सा यांनी केले.
आनंदधाम येथील जैन साधु-साध्वी यांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा डोस देण्यात आला यावेळी आ.अरुणकाका जगताप,आ. संग्राम जगताप,युवाचार्य महेंद्र ऋषीजी म.सा,आलोक ऋषीजी म.सा,जितेंद्र ऋषीजी म.सा,अचाल ऋषीजी म.सा,अक्षय ऋषिजी म.सा,अमृत ऋषीजी म.सा, नरेंद्र बाफना, संजय ताठेड,अनिल दुगड,संतोष बोथरा,ज्येष्ठ नगरसेवक गणेश भोसले,नगरसेवक प्रकाश भागानगरे, मर्चंट बँकेचे संचालक संजय चोपडा, नगरसेवक विपुल शेटीया आदी उपस्थित होते.
यावेळी आ.संग्राम जगताप म्हणाले की,महाराष्ट्रला साधू संतांचा वारसा लाभलेला आहे.त्यांच्या विचाराने आज आपण सर्वजण चालत आहो, त्यांची शिकवण आपण आत्मसात केली पाहिजे आज आनंदधाम येथील साधु-साध्वीना  कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा ढोस देण्यास सुरुवात केली आहे असे ते म्हणाले. यावेळी बोलताना मा.नगरसेवक संजय चोपडा म्हणाले की, आनंधाम येथील साधु-साध्वीना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी आमदार संग्राम जगताप व महापालिका प्रशासन यांच्या कडे पाठपुरावा केल्यानंतर आ.संग्राम जगताप यांनी हा प्रश्न मार्गी लावला, नगर येथे आनंद ऋषीजी म.सा यांचे समाधी स्थळ असल्यामुळे संपूर्ण देशातून साधु-साध्वी येत असतात व या ठिकाणी राहत असतात,ंजैन समाजाचा प्रसार,प्रचार करण्यासाठी हे साधु-साध्वी देशभर फिरत असतात यांच्याकडे कुठल्याही प्रकारे रेशनकार्ड,आधार कार्ड,नसल्यामुळे त्यांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यास मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत होते,परंतु आमदार संग्राम जगताप यांनी पुढाकार घेत आज हे लसीकरण करून घेतले असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment