पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करा ः नेवासा काँग्रेसचे पोलीस अधीक्षकांना निवेदन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 24, 2021

पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करा ः नेवासा काँग्रेसचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

 पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करा ः नेवासा काँग्रेसचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः नेवासा परिसरात पकडलेल्या रेशनचा गहु व तांदुळ श्रीरामपूरच्या काळ्या बाजारात घेऊन जाणार्‍या टेम्पोला पोलीस ठाण्यात न आणता तसेच तहसीलदार यांच्या ताब्यात न देता परस्पर सोडून सोडून दिले,  याप्रकरणी टेम्पो सोडणार्‍या संबंधित पोलीस अधिकार्‍यांवर तातडीने कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना देण्यात आले.
सविस्तर माहिती अशी की, दिनांक 14/06/2021 सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान उस्थळ दुमाला - नेवासा या मार्गाने श्रीरामपूर कडे रेशनचा गहु व तांदूळ घेऊन जाणार्‍या टेम्पोला गायके वस्तीजवळ तालुक्यातील कार्यकर्त्यांनी थांबवून विचारणा केली असता टेम्पोतील माल हा राशनचा असुन तो तालुक्यातूनच भरण्यात आला होता तो खरेदी करून श्रीरामपूर येथे काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येत होता असे निष्पन्न झाले, सदर घटनेची माहिती नेवासा पोलिसांना समजली असता पोलीसही घटनास्थळी हजर झाले, टेम्पो ताब्यात घेतला, यावेळी कार्यकर्त्यांनी टेम्पो पोलीस ठाण्यात घेण्यात यावा अशी मागणी केली ,
परंतु धान्य पकडून देणार्‍याचे मोबाईल फोन पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन चार तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवले, याशिवाय रेशनचा गहू व तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असलेल्या टेम्पोला पोलीस ठाण्यात न आणता ,तहसीलदार यांच्या ताब्यात न देता परस्पर सोडून दिले, पोलीस सूत्रांकडून अधिक माहिती घेतली असता पोलीस डायरीला नोंद करून तहसीलदार यांना कळविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले, मात्र तहसीलदार तसेच पुरवठा निरीक्षक याना विचारणा केली असता याबाबत आम्हाला पोलिसांनी कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही, असे सांगण्यात आले.पोलिसांच्या या भ्रष्ट भूमिकेबद्दल तालुक्यातील जनतेकडुन आश्चर्याबरोबरच चिडही व्यक्त केली जात आहे.
नेवासा काँग्रेसने अन्याय झालेल्या कार्यकर्त्याचे म्हणणे ऐकून यासंदर्भात अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट देऊन सदर प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून संबंधित भ्रष्ट अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाईची मागणी केली.यासंदर्भात तसे निवेदन पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले . यावेळी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संभाजी माळवदे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment