जामखेडमध्ये तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 24, 2021

जामखेडमध्ये तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा

 जामखेडमध्ये तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांना शौर्य स्तंभ उभारून मानवंदना


नगरी दवंडी/प्रतिनिधी
जामखेड ः जामखेडमध्ये 23 जून ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शिवराज्याभिषेक दिन- हिंदू साम्राज्य दिन तिथीनुसार  कोराणाची परीस्थिती पाहता साध्य व पारंपारिक पध्दतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
राज्यात कोरोना पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जप्त 22 जून  शिवराज्यभिषेका निमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले त्यामध्ये 151 शिवभक्तांनी रक्तदान केले व सायंकाळी शिरकाई देवीचा पारंपरिक जागर करण्यात आला.
23 जून जेष्ठ शुद्ध त्रयोदशी ला पाहाटे 5 वा. गडकोट किल्ले व तिर्थक्षेत्र येथील सप्त नद्यांच्या जलाने वेद मंत्रोच्चाराच्या  घोषात पाच पातशह्यांना मातीत गाडून! अखंड हिंदुस्थानचे सार्वभौमत्व स्थापन करणारे! छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक संपन्न झाला.
जामखेड शहरात खर्डा चौक येते आकर्षक भव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या देखावा करण्यात आला. जामखेड ते चोंडी मोटार सायकल रॅली ची सुरवात छत्रपतींच्या मुर्ती ला पुष्पहार घालुन करण्यात आली.
चोंडी गावात ग्रामस्थांनी मोटारसायकल रॅलीचे स्वागत केले. गावात  शौर्य भगव्या ध्वजाची पारंपारिक संबळ वाद्या व हलगी वाद्या च्या संगीताने व भंडार्याची ऊधळ करून गाव प्रदक्षिणा करून पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या राजवाड्या समोर आहिल्यादेवींच्या शौर्या प्रती शौर्य स्तंभ उभारून भगवा ध्वज फडकवुन सर्व शिवभक्तांनी  पुण्यश्लोक अहिल्यादेवींना अभिवादन करून मानवंदना देण्यात आली.
यावेळी शिवछत्रपतींच्या, शंभुराजेंच्या,पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकराचा जय घोषणेच्या आवाजाने अवघी चौंडी दुमधुमून गेली येळकोट येळेकोट जय मल्हार घोष करुन भंडार्याची ऊधळ करण्यात आली.  रणमर्द दताजी शिंदे नायगावकर पथक यांनी मर्दानी खेळ  चित्तथरारक लाठीकाठी, तलवार वाजी, दांडपट्टा, भालाफेक यांचे प्रात्यक्षिक करून चोंडीकरांची मने जिंकुन छत्रपतींचा ईतिहास डोळ्यासमोर उभा केला.
श्री शिवप्रतिष्ठानचे तालुका प्रमुख पांडुरंग मधुकर भोसले यांनी  तरुणांना ढोंगी राजकारणी लोकांच्या कपटी हेतुला व बाजारू भाडोत्री व्याख्याते यांच्या विकलेल्या भावनेला बळी न पडता तसेच जाती पातीत न अडकता राष्ट्रहित, समाजहित, हिंदुधर्मा साठी एकत्र यावे व सर्व महापुरुष क्रांतिकारकांचे शौर्य व हेतु डोळ्यासमोर ठेऊन आयुष्य भर जगले पाहिजे  तसेच सन्मानिय आमदार रोहित दादा पवार यांना पुण्यशोल्क आहिल्यादेवी होळकराची खर्डा चौकात मुर्तीची स्थापना करुन आम्हा शिवप्रेमीची मागणी पुर्ण करावी ही विनंती केली. तसेच खर्डा किल्याची प्रांतअधिकारी यांनी पहानी करून सुध्दा किल्याची झालेली दुर अवस्था व निकुष्ट झालेल्या कामाची चौकशी करावी व ठेकेदारावर कार्यवाही करुन किल्ले शिवपट्टन चे लवकरात लवकर काम पुर्णकरुन शिवप्रेमींची मागणी पूर्ण करावी असे मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी  सर्व शिवप्रेमीं व सर्व पक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते . चोंडी येथे कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

No comments:

Post a Comment