विरोली येथे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शिबीर संपन्न ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 26, 2021

विरोली येथे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शिबीर संपन्न !

 विरोली येथे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शिबीर संपन्न !

पहिल्या टप्प्यात १०० नागरिकांना लस देण्यात आली.



नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी

तालुक्यातील विरोली ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून आरोग्य विभागाच्या वतीने शुक्रवार दिनांक २५ जून रोजी विरोली येथील ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शिबीर घेण्यात आले.या शिबीरात १०० नागरिकांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थ राहुल विठ्ठल मोरे यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

विरोली ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.प्रतिभा शंकर मोरे ,ग्रामसेवक विठ्ठल घुले व ग्रामपंचायत सदस्यांनी आरोग्य विभागाकडे विरोली गावातील नागरिकांसाठी तातडीने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शिबीर घेण्यात यावे अशी मागणी केली होती. तथापि राज्यात लसीचा तुटवडा असल्याने लसीकरण शिबीर घेण्यात प्रचंड अडचणी येत होत्या, माञ सरपंच प्रतिभाताई मोरे व ग्रामसेवक यांनी आरोग्य विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरूच ठेवल्याने अखेर शुक्रवारी विरोली येथे करंदी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे समुपदेशन अधिकारी डॉ तुषार धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शिबीर घेण्यात आले.या शिबीरास गावातील नागरिकांमधून उदंड प्रतिसाद मिळाला.यादरम्यान १०० नागरिकांना कोरोना लस देण्यात आली.

हे लसीकरण यशस्वीपणे पार पाडण्यासाठी करंदी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील सर्व आरोग्यसेविकांनी विशेष परिश्रम घेतले.यादरम्यान नागरिकांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी विरोली गावातील ग्रामसेवक विठ्ठल घुले, सामजिक कार्यकर्ते राहुल मोरे ,ग्रामपंचायत सदस्य आणि प्राथमिक शिक्षक यांनी विशेष सहकार्य केले. तसेच नागरिकांनी गर्दी करू नये व लसीकरण सुरळीत पार पडावे यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी दत्तात्रय साळवे तसेच आशासेविका आश्विनी भागवत यांनी विशेष प्रयत्न केले.


चौकट

"लसीच्या उपलब्धतेनुसार विरोली गावातील सर्व नागरिकांचे लसीकरण टप्प्याटप्प्याने पुर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. लसीकरण पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थ, लसीकरण कमिटी यांनी विशेष सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचे आभार.तसेच लसीकरण झाले असले तरी नागरिकांनी निष्काळजीपणे न वागता कोरोना नियमांचे पालन करावे." -- सौ. प्रतिभा मोरे (सरपंच)

No comments:

Post a Comment