ओबीसी आरक्षणासाठी भाजपचा चक्काजाम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 26, 2021

ओबीसी आरक्षणासाठी भाजपचा चक्काजाम

 जोपर्यंत ओबीसीचं आरक्षण पुनरस्थापित होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांनाच्या निवडूका होता कामा नये : माजी पालकमंत्री राम शिंदे 

ओबीसी आरक्षणासाठी भाजपचा चक्काजाम



नगरी दवंडी / प्रतिनिधी 

अहमदनगर : ओबीसीचे घटनेने दिलेले आरक्षण काढून घेण्याचे काम महा विकास आघाडी सरकारमुळे झाले. 

 महा विकास आघाडीने योग्य ती बाजू सुप्रीम कोर्टात मांडली नाही त्यामुळे ओबीसी चे राजकीय आरक्षण संपुष्टात आले. जोपर्यंत ओबीसीचे आरक्षण पुनर्स्थापित करत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होता कामा नये असा इशारा माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी दिला.

ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी भाजपच्या वतीने शनिवारी (दि. २६) शहरातील सक्कर चौकात सकाळी अकरा वाजता चक्का जाम आंदोलन केले, यावेळी ते बोलत होते.

माजी मंत्री शिंदे पुढे म्हणाले, आरक्षणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचे काम ठाकरे सरकारने केले. हे सरकार टाईमपास सरकार आहे. कोणीच कोणाचं ऐकत नाही हा या तीन पक्षाच्या सरकारचा समान कार्यक्रम आहे. सगळा बट्ट्याबोळ गेल्या पंधरा महिन्याच्या कालावधीत करून ठेवला आहे. त्याला वाचा फोडण्यासाठी भाजपा मैदानात उतरून लोकांच्या हितासाठी लोकशाही मार्गाने चक्का जाम आंदोलन छेडत आहे.

माजीमंत्री कर्डीले म्हणाले, महा विकास आघाडी सरकारचा एकमेकांमध्ये विचार नाही. महा आघाडी सरकारने ज्यावेळेस लक्ष देण्याची गरज होती त्यावेळेस लक्ष न दिल्यामुळे आज ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या  निवडणुका थांबवल्या नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कर्डिले यांनी दिला 

खा. विखे म्हणाले, मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आला या संदर्भात योग्य ती मांडणी ची बाजू राज्य सरकार कडून झाली पाहिजे होती. ती न झाल्यामुळे आज ही सगळी वेळ तमाम महाराष्ट्रातल्या ओबीसी व मराठा समाजावर आलेली आहे. यामहा विकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणाला विरोध करण्यासाठी चक्काजाम आंदोलन महाराष्ट्रभर केले जात आहे.

 यावेळी एड.अभय आगरकर, माजी मंत्री शिवाजी कर्डीले, नां. राम शिंदे, खा. सुजय विखे, अक्षय कर्डीले, सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, महापौर बाबासाहेब वाकळे, भैय्या गंधे, विलास शिंदे , हरीभाऊ कर्डीले, रेवणनाथ चोभे, मनोज कोकाटे , बाळासाहेब निमसे , बाबासाहेब रवर्से , उद्धव कांबळे, दिलीप भालसिंग,शिवाजी कार्ले, बन्सी कराळे, संतोष कुलट, बबनराव आव्हाड , बहिरू कोतकर,वंसतराव सोनवणे, संजय जपकर, जालींदर कदम , कैलास पठारे यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment