रस्त्यांच्या कामासाठी ४ कोटींचा निधी - आ. नीलेश लंके यांची माहीती - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 26, 2021

रस्त्यांच्या कामासाठी ४ कोटींचा निधी - आ. नीलेश लंके यांची माहीती

 रस्त्यांच्या कामासाठी ४ कोटींचा निधी - आ. नीलेश लंके यांची माहीती नगरी दवंडी

पारनेर  प्रतिनिधी 

जिल्हा वार्षीक योजना सन २०२०-२१ अंतर्गत ५०/५४  शिर्षकाखाली  पारनेर  नगर मतदारसंघातील रस्त्यांसाठी ४ कोटींचा निधी मंजुर झाल्याची माहीती आमदार नीलेश लंके यांनी दिली. 

विविध गावांना मंजुर झालेेला निधी पुढीप्रमाणे : 

मौजे दैठणेगुंजाळ ते पिंपळगांव कौडा इजिमा २८६ रस्ता सुधारणा करणे ५० लक्ष, मौजे पुणेवाडी ते रा. मा. ६७ कान्हूर पारनेर इजिमा २२७ रस्ता सुधारणा करणे ५० लक्ष, मौजे हत्तलखिंडी रा. मा. ६७ पारनेर कान्हूर रोड ते इजिमा २८८ रस्ता सुधार करणे ५०  लक्ष, मौजे वनकुटे ते पठारवाडी इजिमा २६० रस्ता सुधार करणे ५० लक्ष, मौजे हंगा शहंजापुर सुपा प्रजिमा १९४ रस्ता सुधारणा करणे १ कोटी, मौजे खारे कर्जुने हिंगणगांव, निमगांववाघा केडगांव प्रजिमा १७० रस्ता सुधारण करणे १ कोटी.निधीसंदर्भात माहीती देताना आ. लंके म्हणाले, कोरोना महामरीमुळे विकास कामांना काहीसा ब्रेक लागला होता. आता कोरोना संसर्ग कमी झाल्याने विविध विकास कामांच्या यापूर्वी दिलेल्या प्रस्तावांना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्राधान्याने मंजुरी दिली आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावांतील विकास कामे मार्गी लावण्याचे आपले नियोजन असून कोणतेही गाव विकासापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. प्रमुख गावांबरोबरच लहान गावे वाडया वस्त्यांवरही विकासाची गंगा पोहचली पाहिजे हे आपले ध्येय असून विकास कामांमध्ये राजकाणाचा अडसर कदापीही येणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. आदीवासी बांधवांसाठीही विविध योजना राबविण्यात येणार असून त्यांचे प्रस्ताव मंत्रालय स्तरावर सादर करण्यात आले आहेत. लवकरच या योजनांचा निधी मंजुर होईल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment