मुस्लिम बांधवांनी गोरगरीबांना जीवनावश्यक साहीत्य वाटप करून जोपासली सामाजिक बांधिलकी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 1, 2021

मुस्लिम बांधवांनी गोरगरीबांना जीवनावश्यक साहीत्य वाटप करून जोपासली सामाजिक बांधिलकी

 मुस्लिम बांधवांनी गोरगरीबांना जीवनावश्यक साहीत्य वाटप करून जोपासली सामाजिक बांधिलकी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
गुंडेगाव ः कोरोना संकटात सापडलेल्या नगर  तालुक्यातील गुंडेगाव  येथील असंख्य  गोरगरीब कुटुंबाच्या  रोजीरोटीचा प्रश्न ऐरणीवर येवून अनेकांच्या चुली बंद होण्याच्या मार्गावर आल्याने त्यांना आधार देण्यासाठी गुंडेगाव येथील आब्बास शेख मेजर यांनी   मंगळवार दि.1 जुन  रोजी गुंडेगाव परिसरातील  येथील 75 लोकांना  एकुण 5000 रुपये किंमतीचा किराणा  गोरगरीब कुटुंबाला जीवनावश्यक  गहू , तांदूळ ,शेंगदाणे ,  साखर ,गोडेतेल,चहा पावडर, इत्यादी किराणा साहित्याचे किट देवून लॉकडाऊनच्या संकट  काळात मुस्लिम बांधवांनी गोरगरीबांच्या मदतीसाठी जात-धर्म विसरून पूढे आले आहेत त्यामुळे आजच्या संकट काळात  माणुसकीचा धर्म जोपासत  कोरोनामुळे रोजगार गमावलेल्या कष्टकरी , मजुर , गोरगरीबांची उपासमार होऊ नये यासाठी दानशूर मुस्लिम बांधवांनी किराणा साहित्याचे वाटप करुन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे . तसेच गावात अब्बास शेख यांनी आपला मुलगा देशासाठी शहीद झाल्यानंतर शहीद मेजर  फिरोज शेख यांच्या स्मरणार्थ गावासाठी 24 तास पिण्याच्या पाण्याची सोय आपल्या मशिदी च्या मार्फत करून हिंदू- मुस्लिम ऐक्य जोपसण्याचे काम खर्या अर्थाने माजी सैनिक मेजर आब्बास शेख यानी सामाजिक बांधिलकी जपत समाजात चांगला संदेश दिला आहे.
    या सामाजिक बांधिलकी बद्दल   गुंडेगावचेसंरपच सौ.मंगलताई सकट व उपसंरपच संतोष  भापकर,माजी सैनिकांची  त्रिदल सेवा संघटनेचे पदाधिकारी श्यामराव कासार, मेजर भवानी प्रसाद चुंबळकर , मेजर राहुल चौधरी,  यांनी मेजर आब्बास शेख यांचे आभार मानले आसून यावेळी उद्योगजक गणेश हराळ दुकानदार, संतोष सकट, रामकृष्ण कुताळ उपस्थितीत होते.

No comments:

Post a Comment