स्टेट बँकेच्या कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवण्यात अधिकारी संघटनेचे योगदान ः विनोद कुमार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 1, 2021

स्टेट बँकेच्या कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवण्यात अधिकारी संघटनेचे योगदान ः विनोद कुमार

 स्टेट बँकेच्या कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवण्यात अधिकारी संघटनेचे योगदान ः विनोद कुमार


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः
भारतीय स्टेट बँकेच्या सर्व योजनांचा लाभ ग्राहकांना मिळावा यासाठी नगर मधील क्षेत्रिय कार्यालयाच्या माध्यमातून उत्कृष्ठ काम केले जात आहे. क्षेत्रिय कार्यालयास रिजन मध्ये अव्वल स्थानी न्यायचे आहे. यासाठी सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांना बरोबर घेत काम करणार आहे. बँकेच्या कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ऑफिसर असोसिएशन चांगले काम करत आहे. यासाठी संघटनेचे व अध्यक्ष वैभव कदम योगदान देत आहे. कर्मचार्‍यांच्या संघटनेला पूर्ण सहकार्य करू, असे प्रतिपादन स्टेट बँकेच्या क्षेत्रिय कार्यालयाचे नूतन क्षेत्रिय व्यवस्थापक विनोद कुमार यांनी केले.
नगर एमआयडीसी मधील भारतीय स्टेट बँकेच्या क्षेत्रिय कार्यालयाचे नवनियुक्त  क्षेत्रिय व्यवस्थापक विनोद कुमार यांचे स्टेट बँक ऑफ इंडिया ऑफिसर असोसिएशनच्या  वतीने स्वागत करण्यात आले. असोसिएशनचे अध्यक्ष वैभव कदम यांनी त्यांचा सत्कार केला. तसेच नव्याने रुजू झालेले व्यवस्थापक वासुदेव राव व नोवेल पिंटो यांचेही स्वागत करण्यात आले. यावेळी ग्राहक सेवेचे मुख्य प्रबंधक मनोज शहा, प्रबंधक शरद बाविस्कर, असोसिएशनचे सहसचिव विकास निकाळजे आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी वैभव कदम म्हणाले, स्टेट बँकेच्या अहमदनगर क्षेत्रिय कार्यालयात आता कोल्हापूर मध्ये उत्कृष्ट काम करणारे क्षेत्रिय व्यवस्थापक विनोद कुमार रुजू झाल्याने निश्चितच याहून अधिक चांगले काम होणार आहे. अभ्यासू, शांत व सर्वांना बरोबर घेवून काम करणारे विनोद कुमार यांच्या नेतृत्वाखाली स्टेट बँकेच्या जिल्ह्यातील सर्व शाखांमधून सर्वोकृष्ट काम होईल. बँकेच्या ऑफिसर असोसिएशनचे सर्व सहकार्य कायम राहील. करोनाच्या या संकटात स्टेट बँक परिवाराने आपली स्वत:ची काळजी घ्यावी, ऑफिसर असोसिएशन तुमची काळजी घेण्यात कमी पडणार नाही. असोसिएशन तुमची काळजी घेण्यात कमी पडणार नाही हे ही ठाम पणे सांगितले.
कार्यक्रमचे सूत्रसंचालन अमोल तारी यांनी केले. विकास निकाळजे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment