राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाच्या शहराध्यक्षपदी विनायक नेवसे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 1, 2021

राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाच्या शहराध्यक्षपदी विनायक नेवसे

 राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाच्या शहराध्यक्षपदी विनायक नेवसे

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघ (नवी दिल्ली) च्या अहमदनगर शहराध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते विनायक नेवसे यांची नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष संदीप लोंढे यांनी नेवसे यांच्या नियुक्तीची घोषणा केली. तर संघाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश शिंदे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी उद्योजक दत्ता जाधव, वैजीनाथ लोखंडे, अ‍ॅड. अनिता दिघे, अमोल बागूल, संजय भिंगारदिवे, विकास सपाटे, प्रमोद डांगे आदी उपस्थित होते.
 जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश शिंदे म्हणाले की, राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघाच्या वतीने नागरिकांच्या न्याय, हक्कासाठी कार्य सुरु आहे. सामाजिक कार्याची दखल घेत युवकांना संघटनेच्या माध्यमातून कार्य करण्याची संधी देण्यात येत आहे. नेवसे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मनुष्याचे हक्क अबाधित राहून त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी संघटना प्रामुख्याने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. उद्योजक दत्ता जाधव यांनी कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्यांना मदतीची व आधार देण्याची गरज आहे. राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघाच्या माध्यमातून या संकटकाळात निश्चितच सर्वसामान्यांना आधार मिळणार असल्याची भावना व्यक्त करुन, नेवसे यांना पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. विनायक नेवसे यांनी समाजातील वंचित व दुर्लक्षित घटकांना न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून कटिबध्द राहणार आहे. वंचितांना न्याय, हक्क मिळवून देण्यातच जीवनाचे खरे समाधान असून, यासाठी नेहमीच कार्यरत राहणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या निवडीबद्दाल अ‍ॅड.प्रशांत साळुंके, अ‍ॅड. धनंजय जाधव, अ‍ॅड. भानुदास होले, पोपटराव बनकर, अ‍ॅड. पुष्पा जेजुरकर, अ‍ॅड.गौरी सामलेटी, अ‍ॅड.प्रणाली चव्हाण, रजनी ताठे, महेश सुरसे, देवा आगरकर, श्रीनिवास रासकोंडा आदींनी नेवसे यांचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment