वासुंदे येथे शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, June 7, 2021

वासुंदे येथे शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा

 वासुंदे येथे शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा

सामाजिक अंतर ठेवत नियमांचे पालन करत कार्यक्रम झाला


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः आज दि.6 जून रोजी ग्रामपंचायत वासुंदे या ठिकाणी शिवराज्याभिषेक दिन सोहळा थाटामाटात संपन्न झाला. यावेळी उपस्थित वासुंदे गावचे  प्रगतिशील शेतकरी भाऊसाहेब सैद, उपसरपंच शंकर बर्वे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब शिंदे, पोपटराव साळुंके गुरुजी,  माजी उपसरपंच महादू भालेकर, सुदाम शिर्के,जालिंदर वाबळे, ग्रामविकास अधिकारी लोंढे भाऊसाहेब, मुख्याध्यापक श्री.भालेकर सर, गिताराम जगदाळे सर, राजेंद्र दाते सर, सर्जेराव जाधव सर, मुख्याध्यापक अमोल शिंदे सर, इंजि.निखील दाते, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अवघ्या महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दरवर्षी 6 जून रोजी किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शिवरायांचा राज्याभिषेक 6जून 1674 या दिवशी झाला. त्यामुळे दरवर्षी 6 जून रोजी तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. तर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी दिवशी तिथीप्रमाणे राज्याभिषेक सोहळा साजरा होतो. यावर्षी महाराजांना मानचा मुजरा देण्यासाठी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या शिवराज्याभिषेक सोहळ्याला एक खास गोष्ट म्हणजे हा सोहळा आता  ’शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्याची महती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचावी हा या कार्यक्रमा मागचा उद्देश आहे असे मत यावेळी प्रगतिशील शेतकरी भाऊसाहेब  सैद यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here