तिसर्‍या लाटेत हा ऑक्सिजन प्लँट ठरणार वरदान ः आ. जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, June 7, 2021

तिसर्‍या लाटेत हा ऑक्सिजन प्लँट ठरणार वरदान ः आ. जगताप

 तिसर्‍या लाटेत हा ऑक्सिजन प्लँट ठरणार वरदान ः आ. जगताप

पर्यावरण दिनानिमित्त हवेतला ऑक्सिजन निर्मिती करणारा प्लँट कार्यान्वित


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः गेल्या दीड वर्षांपासून कोरोना महामारीचे संकट मानवी जीवनावर आले आहेत.या संकट काळात दुर्दैवी दुःखद घटना घडून मनाला वेदना देऊन गेल्या,आता कोणाच्या घरात दुःखद घटना घडू नये यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.यानुसार पाऊले उचली असून उपाययोजना सुरू केल्या आहेत.कोरोनाच्या पहिल्या लाटे पासून आम्ही समाजात काम करत आहोत,या लाटेमध्ये ऑक्सिजनची गरज भासली नाही परंतु दुसर्‍या लाटे मध्ये ऑक्ससीजची गरज मोठ्या प्रमाणात भासली,दुर्दैवाने काही कोरोणा बाधित रुग्णांचा यामध्ये मृत्यूदेखील झाला. दुसर्‍या देशांमध्ये तिसर्‍या लाटेला सुरुवात झाली असून आपण येणार्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर उपाय योजना करत आहोत.तज्ञांच्या मते लहान मुलांवर याकोरोनाच्या लाटेचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली आहे. बालरोगतज्ञान समवेत विचार-विनिमय करून उपाययोजना सुरू केल्या आहेत.सन फार्मा कंपनीच्या माध्यमातून आयुर्वेद शास्त्र मंडळ येथे हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्लांट बसविला असून तो आज कार्यनित करून रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा केला जात असल्याचे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
आयुर्वेद शास्त्र मंडळ येथे जय आनंद फाऊंडेशनच्या माध्यमातून व सन फार्मा कंपनीच्या सहकार्यातून हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्लांटचा शुभारंभ आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न यावेळी नगरसेवक विपुल शेठीया,मर्चंट बँकचे संचालक कमलेश भंडारी, सनफार्मा कंपनीचे प्रकल्पप्रमुख आर.व्ही.कुळकर्णी, कंपनीहेड गिरीष भुजे,इंजी हेड. अविनाश पापडे,एच.आर हेड दादासाहेब पाटील,मॅनेजर श्रीनिवास न्यालपेल्ली,पर्यावरण प्रमुख महेश पाठक,संभाजी पवार,दादा दरेकर,गजेंद्र भांडवलकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सन फार्मचे कंपनीचे प्रकल्प प्रमुख आर.व्ही.कुळकर्णी म्हणाले की,सन फार्मा कंपनीच्या माध्यमातून कोरोना संकट काळामध्ये सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून भारतामध्ये पाच ठिकाणी हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारले असून यापैकी नगर येथील आयुर्वेद शास्त्र मंडळ येथे एक ऑक्सीजन प्लांट उभारण्यात आला आहे. या प्लांटच्या माध्यमातून रुग्णांना शुद्ध ऑक्सिजन मिळणार आहे,हा प्लांट जर्मन देशातील आहे. हवेतील जे घटक जे रुग्णांना नको असतात त्याचे विलगीकरण या प्लांटच्या माध्यमातून केले जाते, त्यामुळे शुद्ध ऑक्सिजन निर्मिती करणारा हा प्लांट आहे.आ.संग्राम जगताप यांच्या मागणीनुसार कंपनीने हा प्लांट सुरू केला आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मर्चंट बँकेचे संचालक कमलेश भंडारी यांनी केले व आभार प्रदर्शन नगरसेवक विपुल शेटिया यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here