सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल पतसंस्थेचा आदर्शवत कारभार अन्य संस्थांसाठी अनुकरणीय : काका कोयटे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 8, 2021

सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल पतसंस्थेचा आदर्शवत कारभार अन्य संस्थांसाठी अनुकरणीय : काका कोयटे

 सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल पतसंस्थेचा आदर्शवत कारभार अन्य संस्थांसाठी अनुकरणीय : काका कोयटे

सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल पतसंस्थेला पतसंस्था फेडरेशनचा प्रतिष्ठित ‘दीपस्तंभ पुरस्कार 2020’ प्रदान


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्यावतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार 2020 नगरमधील सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल नागरी सहकारी पतसंस्थेला प्राप्त झाला आहे. ऑनलाईन माध्यमातून झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या हस्ते संस्थेचे चेअरमन ईश्वर बोरा, व्हाईस चेअरमन किरण शिंगी यांनी हा पुरस्कार स्विकारला. पतसंस्थेला नाशिक विभागातून हा मानाचा पुरस्कार मिळाला असून संस्थेला प्रथमच प्रतिष्ठीत असा पुरस्कार मिळाल्याने सभासदांमधून आनंद व्यक्त होत आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी संचालक समीर बोरा, मनोज गुंदेचा, संतोष गांधी, शैलेश गांधी, अभय पितळे, शांतीलाल गुगळे, सुवर्णा डागा, लताबाई कांबळे, पंडितराव खरपुडे, विनय भांड, सी.ए.विशाल गांधी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत भंडारी आदींनी ऑनलाईन सहभाग नोंदवला.
पुरस्कार प्रदान करताना संस्थेचे कौतुक करताना काका कोयटे म्हणाले की, नाशिक विभागात 10 ते 50 कोटींच्या ठेवी असलेल्या पतसंस्था गटात सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल नागरी सहकारी पतसंस्थेला हा पुरस्कार देण्यात आला आहे. महाराष्ट्रात नावाजलेले सहकारतज्ज्ञ व सहकारी बँकिंग क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तीमत्त्व सुवालालजी गुंदेचा यांंनी या पतसंस्थेची मुहूर्तमेढ रोवली. शिस्तबध्द व दूरदृष्टीचा कारभार या संस्थेचे वैशिष्ट्ये आहे. गुंदेचा यांनी घालून दिलेल्या मार्गावर विद्यमान संचालक मंडळ आदर्श कारभार करीत आहे. विद्यमान चेअरमन ईश्वर बोरा व त्यांचे सहकार्यांनी आताच्या काळात पतसंस्थेचे आर्थिक व्यवस्थापन कसे असावे हे सर्वांना दाखवून दिले आहे. या संस्थेने सोने तारण कर्ज वितरणात दिशादर्शक काम केले आहे. एकूण कर्ज वितरणापैकी 37.38 टक्के कर्ज हे सोनेतारण आहे, त्यामुळे संस्थेचा आर्थिक पाया भक्कम आहे. वेअर हाउस कर्ज वितरणही अतिशय चांगले आहे. संस्थेची 12 कोटी 59 कोटींची गुंतवणूक असून ती 12 वेगवेगळ्या बँकेत केली आहे. एक दोन बँकांवर विसंबून न राहता अनेक ठिकाणी गुंतवणूक करण्याचे संस्थेचे काम सुरक्षितितेच्या दृष्टीने खरोखर आदर्शवत व अन्य संस्थांसाठी अनुकरणीय असेच आहे.
पुरस्काराबद्दल भावना व्यक्त करताना चेअरमन ईश्वर बोरा यांनी सांगितले की, पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांचे मार्गदर्शन व महत्त्वपूर्ण सूचना आमच्या संस्थेसाठी कायम मिळत असतात. सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापन 2000 साली झाली. तेव्हापासून सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा यांच्या मार्गदर्शनाखाली पतसंस्थेची घोडदौड सुरु झाली.

No comments:

Post a Comment