रोटरी क्लब उपक्षित वर्गांची अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा पूर्ण करत आहे : अ‍ॅड. बोरकर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 29, 2021

रोटरी क्लब उपक्षित वर्गांची अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा पूर्ण करत आहे : अ‍ॅड. बोरकर

 रोटरी क्लब उपक्षित वर्गांची अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा पूर्ण करत आहे : अ‍ॅड. बोरकर

रोटरी निवारा वसाहतीच्या नूतनीकरणास शुभारंभ


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः उपक्षित वर्गांची अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा पूर्ण करण्याचे काम नगरचा रोटरी क्लब करत आहे. रोटरी मेन क्लबच्या वतीने एमआयडीसी मध्ये रोटरी निवारा ही दिव्यांग बांधवांसाठी उभारलेली वसाहत हा अनोखा व महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. डॉ.प्रकाश कांकरिया यांच्या मार्गदर्शनाखाली क्ल वेळोवेळी मोठे सहकार्य या वाहतीला करत असतात.  या वसाहतीमधील घरांना डागडुजीची गरज असल्याचे समजताच सर्व घरांचे नूतनीकरणाचे काम रोटरी क्लबने सुरु केले आहे, अशी माहिती रोटरी मेन क्लबचे अध्यक्ष अ‍ॅड. अमित बोरकर यांनी दिली.
रोटरी क्लब ऑफ अहमदनगर शाखेच्या वतीने 1999 साली एमआयडीसी मध्ये 20 अंध नागीरीकांसाठी घरकुले बांधून ‘रोटरी निवारा’ ही वसाहती उभारण्यात आली आहे. क्लबच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या या वसाहतीं मधील सर्व घरांच्या नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ रोटरीचे माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश कांकरिया यांच्या हस्ते झाला. यावेळी माहिती रोटरी मेन क्लबचे अध्यक्ष अ‍ॅड. अमित बोरकर, सचिव पुरषोत्तम जाधाव, डॉ. सुधा कांकरिया, सदस्य निलेश वैकर, प्रशांत बोगावत, महावीर मेहेर, कौशिक कोठारी, डॉ. दादासाहेब करंजुले, महेश गोपाळकृष्णन, अंधसेवा मंडळाचे जेष्ठ सभासद संभाजी भोर आदींसह वसाहतीतील नागरिक उपस्थित होते. डॉ. प्रकाश कांकरिया म्हणाले, रोटरी निवारा या घरकुल प्रकल्पातील सर्व कुटुंबीय हे रोटरी क्लब परिवाराचे सदस्य आहेत. त्यामुळे सर्व बंधू भागानींची काळजी घेणे आमचे कर्त्यव्य आहे. पावसाळ्याचे दिवस सुरु झाल्याने येथील घरांचे नूतनीकरणाचे काम हाती घेतले आहे. प्रास्ताविक क्लबचे सचिव पुरुषोत्तम जाधव यांनी केले. आभार प्रशांत बोगावत यांनी मानले.

No comments:

Post a Comment