लिंगायत लोकनेते सहकारमहर्षी काकासाहेब कोयटे यांच्या नावाची नागपुरात इमारत . - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, June 29, 2021

लिंगायत लोकनेते सहकारमहर्षी काकासाहेब कोयटे यांच्या नावाची नागपुरात इमारत .

 लिंगायत लोकनेते सहकारमहर्षी काकासाहेब कोयटे यांच्या नावाची नागपुरात इमारत.

ना. गडकरींच्या हस्ते लोकार्पण!

शिर्डी ः नागपूर सहकार क्षेत्रात अतिशय आदराने उल्लेख केल्या जाणारे व्यक्तीमत्त्व म्हणजे काकासाहेब कोयटे आहे. कोपरगाव या तालुक्यातून आपल्या जिवनाची सुरूवात करणारे काकासाहेबांचे संपूर्ण आयुष्य सहकारातून अनेकांना रोजगार, व्यवसायाकरिता प्रेरित करण्यात गेले. काकासाहेबांनी स्थापन केलेल्या समता सहकारी पतसंस्थेची आर्थिक उलाढाल 1000 कोटीची आहे. सहकार क्षेत्रात लाखो व्यक्तींना प्रशिक्षित करून रोजगाराची दिशा दाखवली. काकासाहेब आज महाराष्ट्र सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष आहेत. राजकारणात त्यांचा आदरयुक्त, सन्मानाने स्वागत होते.
मा काकासाहेब कोयटे हे लिंगायत संघर्ष समिती चे समन्वयक व महाराष्ट्रातील तमाम लिंगायतांचे नेते आहेत तसेच असंख्य तरुणांचे प्रेरणास्थान आहेत. अशा बहुप्रतिभावंत व्यक्तीमत्त्वाच्या नावाने नागपूर येथे नंदनवन नागपूर येथे काकासाहेब कोयटे सहकार प्रशिक्षण केंद्र या नावाने एका ईमारतीचा लोकार्पण सोहळा मंत्री ना. नितीनजी गडकरी यांच्या शुभहस्ते रविवार, दि. 27/6/2021 रोजी. दुपारी 12 वाजता नंदनवन, नागपुर सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय भेंडे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार क्रश्णा खोपडे, सदाशिव भेंडे, राजेंद्र घाटै आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here