जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ग्रीन फाउंडेशनच्या वतीने होणार ५ हजार वृक्षांचे होणार रोपन..! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, June 5, 2021

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ग्रीन फाउंडेशनच्या वतीने होणार ५ हजार वृक्षांचे होणार रोपन..!

 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ग्रीन फाउंडेशनच्या वतीने होणार ५ हजार वृक्षांचे होणार रोपन..!नगरी दवंडी

शिर्डी प्रतिनिधी : ग्रीन फाउंडेशन च्या वतीने लोणी काळभोर कोळपे वस्ती वन विभाग परिसरात वड, पिंपळ, करंज, आंबा, फणस, आवळा, कदंब, चिंच, बिटी, गुलमोहर, रेट्री, बिगरी अशा विविध औषधी झाडाचे रोपन ग्रीन फाउंडेशन च्या वतीने ५ जून ते १० जून पर्यंत वृक्षारोपण सप्ताह ठेवण्यात आला आहे. यावेळी अमित जगताप म्हणाले की निसर्गाचे संगोपन ही काळाची गरज ओळखून प्रत्येक नागरिकांनी वृक्ष लागवड तसेच संगोपन करण्याची जबाबदारी घेतली पाहीजे. प्रत्येक व्यक्तीने वर्षाला किमान ११ झाडे लावुन जगवली पाहीजे तेव्हा आपला भारत हरित होण्यास वेळ लागणार नाही. जर सर्वानी या कार्यास पाठिंबा दिला तर भारत देश संपूर्ण जगला ऑक्सिजन पुरवेल असे प्रतिपादन अमित जगताप यांनी केले. निसर्ग प्रेमी यांना आवाहन करण्यात आले आहे की वृक्षारोपण कार्यक्रमा साठी श्रमदान करण्यासाठी आपण उपस्थित राहुण सरकारी नियमाचे पालन करूण श्रमदान करण्यासाठी कोळपे वस्ती, रामदरा रोड येथे सकाळी ७ ते ११ या दरम्यान सप्ताहीक कार्यक्रम होईल. तसेच ज्या शेतकरी बांधवांना आंबा रोपे लागली तर ग्रीन फाउंडेशन च्या वतीने मोफत देण्यात येतील असे आवाहन ग्रीन फाउंडेशन पुणे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय शेंडगे यांनी केले. या कार्यक्रमा वेळी हुमे सर, माने सर, मयुर चौधरी, जिवन जाधव, बिरूदेव भास्कर, निरक बिका, सचिन चव्हाण, किरण भोसले, राहुल कुंभार, अमित कुंभार, विजय बोडके, किरण बाचकर, निलेश खोले, कार्तिक जाधव आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here