माझी वसुंधरा अभियानात शिर्डी नगरपंचायतने मिळविला राज्यात प्रथम येण्याचा बहुमान
नगरी दवंडी
शिर्डी प्रतिनिधी -माझी वसुंधरा अभियान अंतर्गत राबविण्यात आलेल्या योजने अंतर्गत शिर्डी नगरपंचायतने माझी वसुंधरा अभियान २०२१ मध्ये महाराष्ट्र राज्यात १११३ गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकविला आहे तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कर्जत नगरपंचायतला ७९९ गुण मिळाले आहेत. राज्य शासनातर्फे माझी वसुंधरा अभियान ही योजना राबविण्यात आली होती त्यात महाराष्ट्रात सर्व नगरपंचायत व महानगर पालिकांचा समावेश होता महानगर पालिका गटात ठाणे महापालिकेने प्रथम क्रमांक पटकावला शिर्डी नगरपंचायतने या अभियाना अंतर्गत राज्यातील नगरपंचायत गटात पूर्ण तन मन धनाने सहभाग घेत तसेच शिर्डीतील सामाजिक संस्था, शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते, नेते, नगरपंचायतचे अधिकारी कर्मचारी, नगरसेवक, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांनी सर्वांनी मिळून ठिकठिकाणी झाडे लावणे, स्वच्छता मोहीम राबविणे, नाला सफाई करणे, नाल्याचे, रस्त्यांचे, उपनगरांचे सुशोभीकरण करणे यात उत्स्फूर्त घेत. शिर्डी सुशोभित व हरित केली त्याचेच फलित म्हणून शिर्डी नगरपंचायत ने माझी वसुंधरा अभियानात संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावत शिर्डीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला या आधीही शिर्डी नगरपंचायतने स्वच्छता अभियान अंतर्गत राबविण्यात आलेल्या योजने वेळी राज्यात तसेच देशात अनुक्रमे प्रथम व दुसरा क्रमांक पटकावून कोट्यवधीची बक्षिसे मिळवत शिर्डीचे नाव देशात उंचावले आहे पुन्हा एकदा राज्यात प्रथम क्रमांक पटकावून नगरपंचायतने विजयाची हॅटट्रिक केल्याने शिर्डी नगरपंचायतचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment