आमदार निलेश लंके यांना राष्ट्रवादी युवतीच्या वतीने एक झाड भेट... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, June 5, 2021

आमदार निलेश लंके यांना राष्ट्रवादी युवतीच्या वतीने एक झाड भेट...

 आमदार निलेश लंके यांना राष्ट्रवादी युवतीच्या वतीने एक झाड भेट...

पर्यावरण दिनानिमित्त राबविला उपक्रम;  पर्यावरणीय उपक्रम राबविणार : कोठावळेनगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी

पर्यावरण दिनानिमित्ताने कोरोनाच्या संकटात रुग्णांसाठी देवदूत ठरलेले पारनेरचे आमदार निलेश लंके यांना आज श्री. शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदिर (कोरोना सेंटर) भाळवणी येथे अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या वतीने एक झाड भेट देण्यात आले.  नैसर्गिक आपत्तीमुळे पर्यावरण संवर्धन अत्यंत गरजेचे आहे. झाडे लागवड करून पर्यावरण पूरक उपक्रम राबवणे गरजेचे आहे. आज प्रदूषणामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे तो ऱ्हास रोखण्यासाठी वृक्षलागवड करणे क्रमप्राप्त असून त्यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविणे गरजेचे आहे. असा संदेश यावेळी अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या वतीने देण्यात आला. या प्रसंगी अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा राजेश्वरी'ताई कोठावळे, पारनेर राष्ट्रवादी युवतीच्या मायाताई रोकडे, अर्चनाताई चाटे, आशाताई वरखडे पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष सोमनाथ वरखडे  व राष्ट्रवादी युवती काँग्रेस  पार्टीच्या युवती सहकारी व आमदार निलेश लंके यांचे सहकारी यावेळी उपस्थित होते.


 नैसर्गिक संकटाला तोंड देण्यासाठी व समाज प्रदूषणमुक्त करण्यासाठी पर्यावरणपूरक उपक्रम राबवून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे.  कोरोनाच्या काळात निर्माण झालेली ऑक्सिजनची परिस्थिती यासाठी वृक्ष लागवड करून नैसर्गिक ऑक्सिजन  निर्माण करणे गरजेचे आहे. अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीने मला झाड  भेट देऊन दिलेला सामाजिक संदेश खरच कौतुकास्पद आहे.  -आमदारलेश लंके (पारनेर-नगर विधानसभा)

प्रदूषणामुळे पर्यावरणाचा आज मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे. पर्यावरण वाचविण्यासाठी आपल्याला सर्वांना वृक्षलागवड ही मोहीम हाती घेणे या पुढील काळात गरजेचे आहे. आमदार निलेशदादा लंके यांना वृक्ष भेट देऊन आम्ही  अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या वतीने समाजात पर्यावरण दिनानिमित्त एक चांगला सामाजिक संदेश देत आहोत. - राजेश्वरी कोठावळे (जिल्हाध्यक्षा : राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टी, अहमदनगर)

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here