'खते कीटकनाशकांची चढ्या भावाने विक्री करू नका'पंचायत समिती प्रशासनाच्या कृषीसेवा केंद्रांना सूचना - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 11, 2021

'खते कीटकनाशकांची चढ्या भावाने विक्री करू नका'पंचायत समिती प्रशासनाच्या कृषीसेवा केंद्रांना सूचना

 'खते कीटकनाशकांची चढ्या भावाने विक्री करू नका'पंचायत समिती प्रशासनाच्या कृषीसेवा केंद्रांना सूचना

नगरी दवंडी / प्रतिनिधी

अहमदनगर :  खते, बी बियाणे, कीटक नाशकांची चढ्या भावाने विक्री करू नये तसेच तसेच शेतकऱ्यांना खरेदीची पक्की बिले द्यावीत अशा सूचना नगर तालुका पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने कृषीसेवा केंद्राना  देण्यात आल्या आहेत.

नगर तालुक्यात खरीपच्या पेरणी साठी शेतकरी वर्ग खते बी बियाणे खरेदीसाठी शहरामध्ये गर्दी करू लागला आहे. दरम्यान अनेक दुकानदारांकडून शेतकऱ्यांना विनाकारण अडवणूक करणे, व गरज नसणाऱ्या वस्तू विक्री करणे याबाबत तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर नगर तालुक्यातील मार्केट यार्ड मधील कृषी केंद्रांची सभापती सुरेखा गुंड उपसभापती डॉ. दिलीप पवार, तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले, विस्तार अधिकारी एन. के. ढेरंगे यांनी कृषी सेवा केंद्रांची तपासणी केली. यावेळी विक्रेत्यांकडून उपलब्ध असलेल्या खते, बियाणे, कीटक नाशकांची माहिती घेण्यात आली. तसेच साठा उपलब्धते बाबत साठाभाव फलक आद्ययावत करून खताचा पूर्वीचा शिल्लक साठा जुन्या दराने विक्री करण्याच्या सूचना देण्यात आल्या.  शेतकऱ्यांनी बियाणे दुकाना संदर्भात तक्रार असल्यास बिलासह तक्रार करावी असे आवाहन पंचायत समिती प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment