_आ.रोहित पवारांच्या पुढाकारातुन जामखेडमध्ये २०० तर कर्जतमध्ये ५० एकरात होणार बीजोत्पादन_ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 11, 2021

_आ.रोहित पवारांच्या पुढाकारातुन जामखेडमध्ये २०० तर कर्जतमध्ये ५० एकरात होणार बीजोत्पादन_

 _आ.रोहित पवारांच्या पुढाकारातुन जामखेडमध्ये २०० तर कर्जतमध्ये ५० एकरात होणार बीजोत्पादन_



नगरी दवंडी

जामखेड - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते तथा कर्जत जामखेडचे आ. रोहित पवार यांच्या पुढाकारातून व महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीजकडुन यंदाच्या खरीप हंगामात जामखेड तालुक्यात तब्बल २०० आणि कर्जत तालुक्यात ५० एकरात उडीदाचा बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.मतदारसंघातील शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या बियाण्यांची गरज आपल्याच तालुक्यातून भागावी हा उद्देश समोर ठेऊन बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.शेतकऱ्यांची पीक वाणाची मागणी,शेतकऱ्यांचा बीजोत्पादन कार्यक्रमात सहभाग,महामंडळाची संबंधित भागात बियाणे साठवणूक व प्रक्रियाक्षमता आणि बिजोत्पादनासाठी नैसर्गिक परिस्थिती आदी बाबींचा विचार करून हा बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येतो.बिजोत्पादनासाठी कर्जत तालुक्यातील पाटेगाव तर जामखेड येथील चौंडी या ठिकाणी हे प्लॉट उपलब्ध करण्यात येणार आहेत.बीजोत्पादित करण्यात येणारे बियाणे हे शंभर टक्के खरेदी करण्याची हमी महामंडळाने घेतलेली आहे मात्र हे बियाणे धान्य म्हणून कोणत्याही व्यापाऱ्याला विकता येणार नाही.१ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत सरासरी उडीद बाजारभावावर २० टक्के आगाऊ रक्कमशेतकऱ्यांना मिळणार आह .कर्जत व जामखेडच्या एकूण २५० एकर क्षेत्रातून सरासरी ५ क्विंटल प्रति एकरप्रमाणे १२५० क्विंटल एवढ्या बियाणाचे उत्पादन मिळणे अपेक्षित आहे.जामखेड तालुक्याला साधारणत: २००० क्विंटल सरासरी महाबीज बियाण्याची आवश्यकता आहे त्यासाठी ५० टक्के बियाणांची गरज आता तालुक्यातूनच भागणार आहे.सध्या चौंडी (ता.जामखेड) येथे सुमारे १५० एकराची बुकिंग पुर्ण झालेली आहे.तर कर्जतच्या पाटेगावमधूनही ५० एकराची बुकिंग पुर्ण झालेली आहे.एकंदरीत दरवर्षी शेतकऱ्यांची बियाण्यांसाठी होणारी ससेहोलपट कायमची थांबणार आहे.


 "गतवर्षी उडीदाच्या बियाणांची मोठी कमतरता होती.मात्र शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी राज्य व परराज्यातील कंपन्यांशी संपर्क साधुन बियाणे उपलब्ध केले.मात्र यापुढे अशी अडचण निर्माण होऊ नये म्हणून आपणच आपले बियाणे निर्माण करावे असे वाटले आणि आता आपली अर्ध्याहून जास्त बियाण्यांची गरज आपल्या तालुक्यातूनच भागणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असे मला वाटते- आ.रोहित पवार


असे असेल बिजोत्पादनाच्या फायद्याचे गणित!

      साधारणपणे बाजारात उडीदाचा बाजारभाव ६ हजार रु. प्रती क्विंटल आहे तर बाजार भावावर २० टक्के आगाऊ रक्कम म्हणजेच १२०० रु.,महाबीजकडुन प्रती क्विंटल देण्यात येणारा बोनस ५०० रु.,बियाण्याला मिळणारे शासकीय अनुदान प्रती क्विंटल ५०० रु.म्हणजेच महाबीजच्या बाजारभावाची रकम ८२०० रुपयांपर्यंत जाते.गेल्यावर्षीचा बीजोत्पादन दर ८५०० ते ८९०० प्रती क्विंटल एवढा होता.

No comments:

Post a Comment