नगर पंचायत समितीने कात टाकली : प्रलंबित कामांना मिळणार गती - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 11, 2021

नगर पंचायत समितीने कात टाकली : प्रलंबित कामांना मिळणार गती

 नगर पंचायत समितीने कात टाकली : प्रलंबित कामांना मिळणार गती


नगरी दवंडी / प्रतिनिधी

अहमदनगर : सध्या लॉकडाऊन उठवले असल्यामुळे नगर पंचायत समितीने कात टाकली असून तालुक्यातील प्रलंबित कामांचा तात्काळ निपटारा होणार आहे.लॉकडाऊन मुळे नागरिक व ग्रामपंचायतीचे अनेक कामे प्रलंबित होते. लॉकडाऊन हटवल्यानंतर पंचायत समितीचे सभापती सुरेखा गुंड व उपसभापती डॉ. दिलीप पवार यांनी सर्व सर्व विभाग प्रमुखांसह गटविकास अधिकारी सचिन घाडगे यांच्या समवेत बैठक घेतली. यानुसार कृषी विभाग, पशुधन विभाग, सां. बा. विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, स्वछता विभाग, समाज कल्याण, महिला  बालकल्याण, शिक्षण विभाग, घरकुल विभाग, आदी विभागातील प्रलंबित प्रकारणांचा निपटारा केला जाणार आहे. तसेच तालुक्यातील पाणी पुरवठा योजना, अपूर्ण बांधकामे, रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यावेळी माजी सभापती रामदास भोर, पंचायत समिती सद्स्य गुलाब शिंदे यासह सर्व खातेप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. पंचायत समितीचे कामकाज अधिक गतिमान केले जाणार असून नागरिकांना अडचणी आल्यास त्यांनी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन सभापती सुरेखा गुंड व उपसभापती डॉ. दिलीप पवार यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment