कृषिमंत्री भुसेंकडे गडाखांना पालकमंत्री करण्याची मागणी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 29, 2021

कृषिमंत्री भुसेंकडे गडाखांना पालकमंत्री करण्याची मागणी.

 कृषिमंत्री भुसेंकडे गडाखांना पालकमंत्री करण्याची मागणी.

सोनईतील ‘शिवसंवाद’ मेळाव्यात पालकमंत्री मुश्रीफांबद्दल नाराजी..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख व शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर यांच्या उपस्थितीत सोनईत काल शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा ‘शिवसंवाद’ मेळावा झाला. या वेळी उपस्थितीत सर्वच पदाधिकार्‍यांनी ‘मंत्री शंकरराव गडाख यांना नगर जिल्ह्याचे पालकमंत्री करा,’ अशी मागणी केली. अनेक पदाधिकार्‍यांनी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.
राहुरी कृषी विद्यापीठ येथील कार्यक्रम आटोपून कृषिमंत्री दादा भुसेंनी नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील घोडेगाव उपबाजारसमितीच्या आवारातील व्यापारी गाळ्यांचे उद्घाटन काल राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते झाले.
यावेळी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यावर कृषिमंत्री भुसे म्हणाले, “काही गोष्टी इथे बोलण्यापेक्षा आम्हाला मंत्रालय पातळीवर बोलाव्या लागणार आहेत आणि काही गोष्टी पाहिजे, तर मुख्यमंत्र्यांच्या पण कानावर घालाव्या लागणार आहेत. पालकमंत्र्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की हे महाविकास आघाडीचे सरकार आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. ते मोठा भाऊ म्हणून काम करत आहेत. त्या पद्धतीची वागणूक नगर जिल्ह्यातील शिवसेनेला सुद्धा दिली पाहिजे. हा विषय आधी त्यांच्या (राष्ट्रवादी) पक्षाच्या नेते मंडळीच्या कानावर घालू, असे सांगत गरज पडली तर मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कानावर पदाधिकार्‍यांच्या भावना घालू. निश्चितपणे आपल्या परंतु तुमच्या मनात जे काय आहे ते पण होतंय का ते पण आपण पाहू असे सूचक वक्तव्य ही त्यांनी केले.
नगर जिल्ह्यातील उत्तरेतील शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख व शहरप्रमुख ‘शिवसंवाद’ मेळाव्यास उपस्थित होते.

No comments:

Post a Comment