बाळ बोठेंच्या बेहिशोबी संपत्तीची चौकशी करा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 29, 2021

बाळ बोठेंच्या बेहिशोबी संपत्तीची चौकशी करा.

 बाळ बोठेंच्या बेहिशोबी संपत्तीची चौकशी करा.

अ‍ॅड लगड यांचे आयकर मुख्य आयुक्तांना स्मरणपत्र.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे हे अनेक संस्थांमध्ये स्लीपिंग पार्टनर, पुण्याच्या काही हॉस्पिटलमध्ये पार्टनर, सावेडीत 15 एकर क्षेत्र, भीस्तबाग परिसरात 7 एकरचा मोठा प्लॉट, भिंगार येथे 5 एकरची जागा अशी ज्ञात संपत्ती असून याव्यतिरिक्त काही अज्ञात संपती असेल त्याची संपूर्ण चौकशी आयकर खात्याने करावी. असे स्मरण पत्र जेष्ठ वकील अ‍ॅड.सुरेश लगड यांनी आयकर खात्याचे मुख्य आयुक्तांना दिले आहे.
अ‍ॅड लगड यांनी मुख्य आयुक्तांना दिलेल्या स्मरण पत्रात म्हटले आहे की, प्रतिकूल परिस्थितीत हा बाळ बोठे हा झटपट (आर्थिक दृष्ट्या) मोठा झाला. बोठेची सुरवातीची आर्थिक परिस्थिती व आताची आर्थिक परिस्थिती काय आहे. याची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने केली, तर अनेक धक्कादायक बाबी उघड होतील, बोठेचे उत्पन्न व त्याच्या कडे असलेली ज्ञात, अज्ञात,जंगम मिळकत, कॅश रक्कम याची चौकशी केली तर पत्रकरिता क्षेत्रातील ही व्यक्ती इतक्या झटपट श्रीमंत कशी होऊ शकते? व त्यास भरीव असे उत्पन्नाचे कोणते साधन होते कि इतकी माया गोळा करू शकला?. याबाबत खुलासा होऊ शकेल असेही लगड यांनी निवेदनात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment