ऑक्सिजन हा कोविड परिस्थितीत मानवी जीवनाचा महत्त्वाचा घटक - आ. अरुणकाका जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, June 1, 2021

ऑक्सिजन हा कोविड परिस्थितीत मानवी जीवनाचा महत्त्वाचा घटक - आ. अरुणकाका जगताप

 ऑक्सिजन हा कोविड परिस्थितीत मानवी जीवनाचा महत्त्वाचा घटक - आ. अरुणकाका जगताप

आयुर्वेद कॉलेज येथे हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणार्‍या प्लांटच्या उभारणी कामाचा शुभारंभ


अहमदनगर ः
कोरोना संसर्ग विषाणूंमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये नागरिक मोठया संख्येने कोरोनाच्या आजाराने बाधित झाले होते.काही रुग्ण अतिसंवेदनशील झाल्यामुळे या रुग्णांना ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणात भासत होती. दुर्दैवाने काही रुग्णांचा मृत्यू ही झाला, भविष्य काळामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू नये यासाठी आयुर्वेद कॉलेज येथे हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्लांटची उभारणीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. येत्या दोन दिवसांमध्ये हा प्लांट कार्यान्वित होऊन रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा केला जाईल असे प्रतिपादन आ.अरुणकाका जगताप यांनी केले.
आ.संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून आयुर्वेद कॉलेज येथे जय आनंद फाउंडेशन यांच्या सहकार्यातून हवेतून ऑक्सिजन निर्मिती करण्याच्या प्लांटच्या कामाचा शुभारंभ आ.अरुणकाका जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी समवेत डॉ.विजय भांडरी, बाजार समितीचे संचालक राजेंद्र बोथरा, नगरसेवक विपुल शेठया, कमलेश भंडारी, भूपेंद्र परदेशी, शिवा कराळे, सनफार्मा कंपनीचे जनरल मॅनेजर अविनाश पापडे, सिनियर मॅनेजर अतुल सुतार, इंजि.अमोल धाडगे, इंजि. घनश्याम सरडे, इंजि.प्रवीण गाडेकर, रितेश परक, मिनेश छाजेड, वैभव मेहर, अमित वर्मा, प्रशांत मुथाआदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here