हाजी अजीजभाई सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने झेंडीगेटच्या शाळा नं. 4 मध्ये लसीकरण केंद्र सुरु करा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 1, 2021

हाजी अजीजभाई सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने झेंडीगेटच्या शाळा नं. 4 मध्ये लसीकरण केंद्र सुरु करा

 हाजी अजीजभाई सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने झेंडीगेटच्या शाळा नं. 4 मध्ये लसीकरण केंद्र सुरु करा

मनपा आरोग्य अधिकारी यांना निवेदन


अहमदनगर-
झेंडीगेट येथील महापालिकेच्या शाळा नं. चार मध्ये कोरोना लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी हाजी अजीजभाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन प्रतिष्ठानचे अकलाख शेख यांनी महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिक बोरगे यांना दिले. यावेळी अल्ताफ शेख, मोहंमद हुसेन इराणी, मोहसीन शेख, जाकिर शेख, फकिर शेख आदी उपस्थित होते.
शहरातील झेंडीगेट भागात मोठ्या संख्येने नागरिक राहतात. येथील नागरिकांना महापालिकेच्या तोफखाना किंवा माळीवाडा आरोग्य केंद्रात जाऊन लस घ्यावी लागत आहे. यामुळे या लसीकरण केंद्रावर गर्दी होत आहे. लसीकरण केंद्रावरील गर्दीमुळे कोरोना संक्रमणाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. या भितीमुळे अनेक ज्येष्ठ नागरिक लसीकरण केंद्रावर जाण्यास तयार नाही. नागरिकांना जवळच्या ठिकाणी लसीकरण केंद्र उपलब्ध झाल्यास गर्दी न होता ज्येष्ठ नागरिक व महिलांची सोय होऊन नियोजनरित्या लसीकरण पार पडणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

No comments:

Post a Comment