पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे विचार समाजाला प्रेरणादायी- माणिक विधाते - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 1, 2021

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे विचार समाजाला प्रेरणादायी- माणिक विधाते

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शहरजिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अभिवादन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे विचार समाजाला प्रेरणादायी- माणिक विधाते


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार समाजाला प्रेरणादायी असून समाजाने त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजे आजच्या युवापिढीला त्याचे विचार प्रेरणा देणारे आहेत याच बरोबर त्यांनी समाजातील जातिभेद नष्ट करण्यासाठी खूप मोठे योगदान दिले तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी त्याकाळी वृक्षारोपण व त्याचे संवर्धनाची गरज ओळखून त्यांनी पावले उचलली होती तसेच ’पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचेकडे दुरदृष्टी होती. त्यांनी शेतकरी सुखी तर जग सुखी या संकल्पनेतून शेतकर्यांना जाचक करामधून मुक्त केले होते. भारतातील तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी व राज्यात मंदिरे, धर्मशाळा, तलाव, विहिरी, पाणपोई, घाट अशी अनेक समाज उपयोगी कामे त्यांनी केली. त्याकाळात त्यांनी पाण्याचे महत्व जाणून पाणी अडवा, पाणी जिरवा ही संकल्पना राबविली. आजच्या आपत्तीच्या काळामध्येही अहिल्यादेवींनी केलेल्या पाणी व्यवस्थापनाचा व त्यांच्या उपाययोजनांची अंमलबजावणी होत आहे,’ असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते यांनी व्यक्त केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, समवेत बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, मा.विजय गव्हाळे, लंकेश चितळकर, गणेश बोरुडे, लहू कराळे, दीपक होले आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment