सावेडीचा कायापालट करण्यात स्व.दिगंबर ढवण यांचे मोठे योगदान - खा.सुजय विखे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 1, 2021

सावेडीचा कायापालट करण्यात स्व.दिगंबर ढवण यांचे मोठे योगदान - खा.सुजय विखे

 सावेडीचा कायापालट करण्यात स्व.दिगंबर ढवण यांचे मोठे योगदान - खा.सुजय विखे\

स्व.दिगंबर ढवण यांच्या जयंतीनिमित्त किरणा वाटप


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः स्व.दिगंबर ढवण यांनी अल्पकाळातच पाईपलाईन रोड, ढवणवस्ती परिसरात लोकउपयुक्त कार्य करुन आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला. उपनगराचा वाढता विस्तार पाहता नागरिकांचे प्रश्न सुटावेत, त्यांना मुलभुत सुविधा मिळाव्यात यासाठी ते नेहमीच आग्रही राहिले आहेत. त्यामुळे या भागात अनेक विकास कामे होऊन या भागाचा कायापालट झाला. कोरोनामुळे आज सर्वांचीच बिकट परिस्थिती झाली आहे. अशा परिस्थिती एकमेकांना प्रत्येकाने आधार देण्याची गरज आहे. स्व.दिगंबर ढवण यांच्या जयंतीनिमित्त किरणा वाटप करुन त्यांचे कार्य पुढे सुरु आहे, हीच त्यांच्या स्मृतीस खरी श्रद्धांजली आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ.सुजय विखे यांनी केले.
स्व.दिगंबर (महाराज) ढवण यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवी विचार मंचच्यावतीने ढवणवस्ती येथे किरणा वाटप करण्यात आले. याप्रसंगी खासदार डॉ.सुजय विखे, शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेविका दिपाली बारस्कर, नगरसेवक स्वप्नील शिंदे, माजी नगरसेविका शारदाताई ढवण, अनिल ढवण, बाळासाहेब बारस्कर, निशांत दातीर, ऋषीकेश ढवण, रोहन ढवण, तुषार पोटे, विशाल नाकाडे, कैलास गर्जे, चंद्रकांत तागड आदि उपस्थित होते. याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते म्हणाले, सच्चा शिवसैनिक म्हणून स्व.दिगंबर ढवणे यांचे नाव सर्वात पुढे आहे. शिवसेनेच्या माध्यमातून समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. परिसराच्या विकासासाठी अहोरात्र काम करुन या भागात विकास कामांची गंगा त्यांनी आणली. तपोवन रोडसाठी  38 मोर्चे काढले होते. आज हा रस्ता झाला याचे संपूर्ण श्रेय हे स्व.ढवण यांनाच जाते.  नागरिकांच्या प्रश्नांसाठी नगर शहरात हजारोंच्या संख्येने मोर्चा काढण्यात स्व.ढवण यांचा हातखंडा होता. त्यांच्या जयंतीनिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवून समाजाप्रती ऋण व्यक्त केले आहे. याप्रसंगी भगवान फुलसौंदर, बाळासाहेब बोराटे, दिपाली बारस्कर आदिंनी स्व.ढवण यांच्या कार्याचा गौरव केला. प्रास्तविकात अनिल ढवण यांनी सांगितले की, मागील लॉकडाऊनमध्येही किरणा किटचे वाटप केले होता. आजही स्व.दिगंबर ढवण यांच्या जयंतीनिमित्त किरणा वाटप करुन त्यांचा आदर्श पुढे सुरु ठेवला आहे. यावेळी मयुर फणसे, अर्जुन कजबे, राजू तागड, चंद्रकांत फणसे, तुषार यादव, सुनिल ढवण, सागर पोळ, बंट्टी गर्जे, रोहित मराठे, सुनिल भुकन, शरद धलपे, सचिन खाटेकर, कुणाल कुलकर्णी, राजू मंगलाराम, सूत्रसंचालन ऋषीकेश ढवण यांनी केले. सर्वांचे आभार रोहन ढवण यांनी मानले.

No comments:

Post a Comment