आंतरराष्ट्रीय किक बॅाक्सींग खेळाडू, (ग्रा.सदस्य)वर हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, June 16, 2021

आंतरराष्ट्रीय किक बॅाक्सींग खेळाडू, (ग्रा.सदस्य)वर हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

 आंतरराष्ट्रीय किक बॅाक्सींग खेळाडू, (ग्रा.सदस्य)वर हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

हल्लेखोर पसार; नेवासा परीसरात खळबळ


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नेवासा तालुक्यातील कांगोणी फाट्यावरून बुर्‍हाणपुर रोडने आपल्या घरी जात असताना ग्रामपंचायत सदस्य,किक बॉक्सींग आंतरराष्ट्रीय खेडाळु संकेत भानुदास चव्हाण वय 23 यांच्यावर काल रात्री साडेनऊच्या सुमारासदुचाकीवरुन आलेल्या त्यांचेच गावातील बाळासाहेब हापसे व विजय भांबरकर यांनी संकेत यांच्यावर गावठी कट्ट्यातून 6 गोळ्या झाडल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. सुरूवातीला त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज एका खाजगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचे शरीरातुन 4 गोळया काढण्यात आल्या आहेत.त्यांची परीस्थीती धोक्याबाहेर असल्याचे समजते. या घटनेने नेवासा परिसरात खळबळ उडाली आहे.
गोळ्या झाडणारे हल्लेखोर दुचाकीवरून फरार झाले असून हल्ल्यामागचे नेमके कारण समजले नाही. याप्रकरणी शनीशिंगणापूर पोलीस ठाण्यात दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान घटनेची माहिती समजताच शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे, सोनईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राम कर्पे, शनीशिंगणापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राचीन बागूल यांनी मोठ्या पोलीस फौ फाट्यासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. संकेत यांच्या हल्लेखोरांचा लवकरात लवकर तपास न लागल्यास नगर- औरंगाबाद महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा छावा क्रांती मोर्चा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक चव्हाण, तालुका तालीम संघाचे संदीप कर्डीले, जिल्हा किक बॉक्सिंग असोसिएशनचे स्वप्नील वारुळे यांच्यासह बर्हाणपूर ग्रामस्थांनी दिला आहे. याप्रकरणी  आरोपी आरोपींची ओळख पटली असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल असे सपोनि. सचिन बागुल, यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here