आशा व गटप्रवर्तक कर्मचार्‍यांचा बेमुदत संप मागे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 24, 2021

आशा व गटप्रवर्तक कर्मचार्‍यांचा बेमुदत संप मागे

 आशा व गटप्रवर्तक कर्मचार्‍यांचा बेमुदत संप मागे

। आशांना 1000 व गटप्रवर्तकांना 1200 रुपये वाढ । 500 रुपये कोरोना काळातील प्रोत्साहन भत्ता मंजूर


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः विविध मागण्यांसाठी गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या आशा व गटप्रवर्तक कर्मचार्यांच्या बेमुदत संप प्रकरणी तडजोड होऊन संप मागे घेण्यात आला आहे. राज्यातील तब्बल 72 हजार आशा व गटप्रवर्तक कर्मचारी या संपात उतरले होते. बुधवारी (दि.23 जून) राज्याचे आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी मंत्रालयात महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या पदाधिकार्यांशी चर्चा करुन संप प्रकरणी तडजोड घडवून आणली असल्याची माहिती अ‍ॅड. सुधीर टोकेकर यांनी दिली.
मंत्रालयात झालेल्या बैठकित आशांना 1 जुलै 2021 पासून 1500 व गटप्रवर्तकांना 1700 रुपये दरमहा रुपये वाढ मिळणार आहे.त्यापैकी माहिती संकलन व सादरीकरण या कामी आशांना दरमहा 1000 व गटप्रवर्तकना 1200 रुपये  निश्चित व कायमस्वरूपी वाढ असून 500 रुपये कोरोना काळातील प्रोत्साहन भत्ता म्हणून मिळणार आहे. तसेच पुढील वर्षी 1 जुलै 2022 पासून आशा व गटप्रवर्तकांना 500 रुपये निश्चित व कायमस्वरूपी वाढ मिळण्याची तडजोड करण्यात आली. या निर्णयाचे अहमदनगर जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तकांच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे.
आशां व गटा प्रवर्तकांच्या कामकाजाबाबत व सेवाशर्ती बाबत अभ्यास करण्यासाठी यशदाची समिती नियुक्त करण्यात येईल, गट प्रवर्तकांना सुसूत्रीकरण मध्ये समावेश व जिल्हा परिषद नोकर भरतीत गट प्रवर्तकांना आरक्षण, आशा काम मूल्यमापन व मोबदला बाबत अभ्यास समिती व या समितीवर आशा व गटप्रवर्तक संघटनांचे प्रतिनिधी असतील. राज्यातील नगरपालिका व महानगरपालिका नगरपंचायतीने कोवीड कामासाठी आशा व गटप्रवर्तक यांना प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत शिफारस करण्यात येईल. लसीकरणच्या मोहिमेमध्ये सोशल मोबिलाइजर व ग्राउंड मॅनेजमेंट या प्रकारची कामे करण्यासाठी 200 रुपये प्रति दिन भत्ता देण्यात येणार आहे. ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात रुग्णांना घेऊन जाणार्‍या आशा कर्मचार्यांसाठी आशा निवारा केंद्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आशा यांचे मानधन व मोबदला यांचा तपशील त्यांना लेखी देण्यात येणार आहे. कोरोना बाधित  होऊन मयत झालेल्या आशा यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये विमा मिळण्यासाठी तातडीने कारवाई करण्यात येईल. आशा व त्यांच्या कुटुंबियांना जिल्हा रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येईल. एक.एन.एम. व जीएनएम साठी प्रशिक्षण देऊन भरती करण्यासाठी संधी देण्यात येणार आहे. आशा व गटप्रवर्तकांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी कठोर कारवाई करण्यात येणार असून, संपा केल्याबद्दल आशा व गटप्रवर्तक यांविरुद्ध कुठलीही कारवाई होणार नाही. वेतन किंवा मोबदल्यात कपात होणार नसल्याचे या बैठकित निर्णय घेण्यात आले. महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने एम.ए. पाटील, राजू देसले, डॉ.डी. एल. कराड, शुभा शमीम, श्रीमंत घोडके, शंकर पुजारी, सुवर्णा कांबळे, राजेश सिंग, पद्माकर इंगळे यांनी चर्चेत भाग घेतला. या निर्णयाचे अहमदनगर जिल्ह्यातील आयटक संलग्न अहमदनगर आशा कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर, अध्यक्ष अ‍ॅड. कॉ सुभाष लांडे, जिल्हा कार्याध्यक्ष सुवर्णा थोरात, उत्तर संघटक कॉ. सुरेश पानसरे आदिंसह सर्व पदाधिकारी, आशा व गटप्रवर्तकांनी स्वागत करुन आरोग्य मंत्री राजेश टोपे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व संघटना प्रतिनिधींचे आभार मानले.

No comments:

Post a Comment