नवनागापूर, वडगाव गुप्ता, निंबळक, इसळकला स्वतंत्र नगरपालिका स्थापन करा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 24, 2021

नवनागापूर, वडगाव गुप्ता, निंबळक, इसळकला स्वतंत्र नगरपालिका स्थापन करा.

 नवनागापूर, वडगाव गुप्ता, निंबळक, इसळकला स्वतंत्र नगरपालिका स्थापन करा.

सामाजिक संघटनांचे मुख्यमंत्री, नगर विकास मंत्र्यांना निवेदन..

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहराच्या उत्तरेला लागून असलेल्या नवनागापूर, वडगाव गुप्ता, निंबळक, इसळक या गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन संघटनांच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना पाठविण्यात आले असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
महाराष्ट्रातील मंत्रीमंडळात तरुण असलेले नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे अतिशय कार्यक्षमतेने कार्य करीत आहेत. याचा जनतेला जास्तीत जास्त फायदा होत आहे. मागील आठवड्यात त्यांनी नागरदेवळे आणि आजूबाजूच्या गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचे वक्तव्याने सर्वसामान्य नागरिकांच्या आशा पल्लवीत केल्या आहेत. याच धर्तीवर नवनागापूर, वडगाव गुप्ता, निंबळक, इसळक या गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन केल्यास शहरासह शहरालगत असलेल्या परिसराचा झपाट्याने विकास होणार आहे. त्यांनी दाखवलेला दूरदृष्टीकोन व विकासात्मक व्हिजनचे  संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे. शहरालगत असलेला परिसर अनेक वर्षे नागरी विकासापासून वंचित राहिलेला आहे. या परिसराला न्याय देण्यासाठी तनपुरे यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. अहमदनगर शहरामध्ये वीस हजार पेक्षा जास्त लोकांची बेघर म्हणून अहमदनगर महापालिकेत नोंद आहे. परंतु त्यांना आजपर्यंत घरे मिळाली नाहीत. यामुळे या नव्या स्वतंत्र नगरपालिका क्षेत्रात जागांचे भाव कमी राहणार असल्यामुळे हजारो बेघरांना घर उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. गावातील ग्रामस्थांना देखील या निर्णयाला पाठिंबा असून, नवनागापूर, वडगाव गुप्ता, निंबळक, इसळक या गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी अ‍ॅड. गवळी, कॉ. बाबा आरगडे, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ओम कदम, शाहीर कान्हू सुंबे, अंबिका नागुल, विठ्ठल सुरम, अशोक सब्बन प्रयत्नशील आहेत.

No comments:

Post a Comment