बाल गोपालांनी साजरा केला हिंदू साम्राज्य दिन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, June 24, 2021

बाल गोपालांनी साजरा केला हिंदू साम्राज्य दिन

 बाल गोपालांनी साजरा केला हिंदू साम्राज्य दिन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर शहर धर्म जागरणाच्या वतीने रामवडी सेवा वस्ती मधील गणपती मंदिर आरती केंद्रा वरती जेष्ठ शुद्ध त्रयोदशी श्रीशिवराज्याभिषेक हिंदू साम्राज्य दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आणि वक्ते म्हणून श्री राहुल जी पुरोहित होते. राहुल जी यांचे स्वागत नगर शहर धर्म जागरण प्रमुख प्रफुल्ल सुरपुरीया यांनी केले. प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे राहुल जी यांनी श्रीशिवराज्याभिषेक हिंदू साम्राज्य दिनाची सविस्तर माहिती सोप्या शब्दात मांडली उपस्थीत जमलेल्या सर्वांना हिंदू साम्राज्य गीत ऐकवण्यात आले शेवटी श्री शिवाजी महाराज यांची आरती करून प्रसाद वाटण्यात आला आरती झाल्या वरती सर्वांनी शिवाजी महाराजांचा जय घोष केला. हिंदू  साम्राज्य  दिना निमित्त श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमे समोर सुंदर रांगोळी बालकांनी काढली होती. कार्यक्रमाला राहुल जी पुरोहित, प्रफुल्ल सुरपुरीया, गणेश भंडारी, विकास धाडगे, आशमीत गोडखे, अंकिता चलाके, पूजा चकाले, ओम रणसिंग, संदेश गायकवाड, मंगेश उल्हारे, गणेश सामल, राजू कांबळे, गणेश रणसिंग, रोहन गायकवाड आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here