युवतीचे अश्लील फोटो काढून ब्लॅकमेलिंग, अत्याचार तोफखाना पोलीस ठाण्यात तरुणावर गुन्हा दाखल.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 29, 2021

युवतीचे अश्लील फोटो काढून ब्लॅकमेलिंग, अत्याचार तोफखाना पोलीस ठाण्यात तरुणावर गुन्हा दाखल..

 युवतीचे अश्लील फोटो काढून ब्लॅकमेलिंग, अत्याचार तोफखाना पोलीस ठाण्यात तरुणावर गुन्हा दाखल..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या तरुणीसोबत आक्षेपार्ह फोटो काढून तिला बदनामीची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी सोहेल अख्तर सय्यद (रा.मुकुंदनगर) याचेवर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित तरुणी आणि आरोपी एकाच महाविद्यालयात शिक्षण घेतात. दरम्यानच्या काळात आरोपीनं पीडितेशी मैत्री करून तिच्यासोबत आक्षेपार्ह फोटो काढले. यानंतर हे फोटोज व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीनं पीडितेवर वारंवार बलात्कार केला आहे. आरोपीनं पीडितेचं लैंगिक शोषण आणि त्रास सुरूच ठेवला. यानंतर आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेनं अहमदनगरमधील तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
आरोपीने पीडितेला पुन्हा बदनामीची धमकी देत तिच्याकडून पैशाची मागणी केली. घाबरलेल्या तरुणीनं आपल्याजवळी आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आरोपीला दिले. तरीही आरोपीचा त्रास कमी झाला नाही. त्यामुळे आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेनं अहमदनगरमधील तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोपीनं 19 मे ते 17 जून च्या दरम्यान सोलापूर रोडवरील लॉज आणि चांदबीबी महाल परिसरात अनेकदा बलात्कार केला. असल्याचा आरोप पीडितेने केला आहे. पोलिसांनी बलात्कार, धमकी आणि अन्य कलमांतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा तपास तोफखाना पोलीस करत आहेत.

No comments:

Post a Comment