कोरोना तपासणी अहवालाच्या दिरंगाईबद्दल आरोमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीची घेतली गेली दखल ; - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 11, 2021

कोरोना तपासणी अहवालाच्या दिरंगाईबद्दल आरोमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीची घेतली गेली दखल ;

 कोरोना तपासणी अहवालाच्या दिरंगाईबद्दल आरोमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीची घेतली गेली दखल ; 

"पारनेर परिवर्तनच्या" लढ्याला  यश...!

 जिल्हा आरोग्य विभागाने प्रलंबित अहवाल तातडीने पाठविले.



नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी

कोरोना चाचणी अहवाल उशिरा येत असल्याने रुग्णांवर उपचार करता येत नव्हते. अहवाल येईपर्यंत कोरोनाबधित रुग्ण अनेकांना बाधित करत असल्याने तातडीने कोरोना चाचणी अहवाल मिळावे यासाठी ग्रामसमृद्धी फौंडेशन वडनेर बु. चे अध्यक्ष व पारनेर परिवर्तनचे उपाध्यक्ष विकास वाजे यांनी आरोग्यमंत्रांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची तातडीने दखल जिल्हा आरोग्य विभागाकडून घेण्यात आली असून प्रलंबित अहवाल रुग्णांना पाठविण्यात आले आहे.

प्रशासनाच्या वतीने कोरोना आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत परंतु कोरोना अहवाल उशिरा येत असल्याने कोरोनाबधित रुग्ण लवकर निष्पन्न न झाल्याने रुग्णसंख्या वाढत आहे.याबत ग्रामसमृद्धी फौंडेशनचे अध्यक्ष व पारनेर परिवर्तनचे उपाध्यक्ष विकास वाजे यांनी आरोग्यमंत्रांकडे मेल द्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची जिल्हा आरोग्य विभागाकडून दखल घेण्यात आली असून तातडीने प्रलंबित अहवाल रुग्णांना पाठविण्यात आले आहेत. याबाबत आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विकास वाजे यांना फोनद्वारे संपर्क करून अहवाल पाठवले असल्याची माहिती दिली. यापुढील काळात कोरोना अहवाल तातडीने देण्यात येतील अशी खात्री देखील यावेळी जिल्हा आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली.

सोशल मीडिया व मिडियामुळे प्रश्न सुटला - वाजे

कोरोना तपासणी अहवाल उशिरा येत असल्याची तक्रार आरोग्यमंत्र्यांकडे मेलद्वारे केल्यानंतर सोशल मीडिया व वृत्तपत्रांमध्ये बातम्यांमधून या प्रश्नावर आवाज उठविण्यात आला. त्यानंतर आरोग्य विभागावर दबाव आल्यानंतर तातडीने अहवाल रुग्णांना मिळाले असून प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. सोशल मीडिया व वृत्तपत्र यामुळेच हा प्रश्न सुटला  आहे. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ नेहमी सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून न्याय मिळवून देत असल्याची प्रतिक्रिया पारनेर परिवर्तनचे उपाध्यक्ष विकास वाजे यांनी दिली.

No comments:

Post a Comment