सहकार संस्थेचे निवृत्त अतिरिक्त आयुक्त व विशेष निबंधक भास्करराव शेळके यांच्याकडून वाढदिवसानिमित्त कोव्हीड सेंटरला २५ हजारांची मदत..! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, June 11, 2021

सहकार संस्थेचे निवृत्त अतिरिक्त आयुक्त व विशेष निबंधक भास्करराव शेळके यांच्याकडून वाढदिवसानिमित्त कोव्हीड सेंटरला २५ हजारांची मदत..!

 सहकार संस्थेचे निवृत्त अतिरिक्त आयुक्त व विशेष निबंधक भास्करराव शेळके यांच्याकडून वाढदिवसानिमित्त कोव्हीड सेंटरला २५ हजारांची मदत..!

डॉ. पठारे यांचे काम राज्यातील डॉक्टरांना दिशादर्शक - भास्करराव शेळके
नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी

सहकारी संस्था महाराष्ट्र राज्याचे निवृत्त अतिरिक्त आयुक्त व विशेष निबंधक   मा. भास्करराव भिकाजी शेळके यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वतःच्या वाढदिवसानिमित्त पारनेर येथील डॉ श्रीकांत पठारे संचलित कोव्हीड सेंटरला २५ हजार रुपयांची देणगी दिली.

पारनेर तालुक्यात शिवसेनेच्या डॉ श्रीकांत पठारे यांनी सुरू केलेल्या ग्रामीण रुग्णालय डेडिकेटेड पूर्णवाद भवन येथील कोव्हीड सेंटरमध्ये आतापर्यंत हजारो कोरोना रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहे. या कोव्हीड सेंटरला श्री स्वामी समर्थ सहकारी बँकेचे आधारस्तंभ, महाराष्ट्र राज्याचे सहकार संस्थेचे निवृत्त अप्पर आयुक्त व विशेष निबंधक भास्करराव भिकाजी शेळके यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी म्हणून कोव्हीड सेंटरला २५ हजार रुपयांची देणगी दिली. भास्करराव शेळके हे पारनेर तालुक्यातील भोंद्रे गावचे सुपुत्र असून ते नोकरीनिमित्त पुण्यात आहेत. अहमदनगर जिल्हा मित्र मंडळ पुणे चे अध्यक्ष आहेत. खासगी डॉक्टरकडून स्वतःचा दवाखाना असताना देखील कोव्हीड सेंटरच्या माध्यमातून उपचार करणारे डॉ श्रीकांत पठारे हे राज्यातील एकमेव डॉक्टर आहे. कोरोनापासून लहान मुलांना वाचविण्यासाठी डॉ श्रीकांत पठारे हे बालरोग कोव्हीड विभाग सुरू करत असून हे देखील राज्यातील पाहिले बालरोग कोव्हीड विभाग असणार आहे. डॉ श्रीकांत पठारे यांचे काम राज्यातील डॉक्टरांना दिशादर्शक असल्याचे गौरवोद्गार भास्करराव शेळके यांनी यावेळी काढले. त्यांचे सामाजिक काम पाहून मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी म्हणून डॉ श्रीकांत पठारे संचलित कोव्हीड सेंटरला २५ हजार रुपयांची देणगी देत असल्याचे शेळके यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here