उपविभागीय पोलीस अधिकारी जाधव यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 15, 2021

उपविभागीय पोलीस अधिकारी जाधव यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

 उपविभागीय पोलीस अधिकारी जाधव यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर येथील संतोष शिंदे यांच्यावर राजाराम ढवळे यांनी बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांना हाताशी धरून खोटा गुन्हा दाखल केल्या प्रकरणी सखोल चौकशी करून राजाराम ढवळे व पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्यावरती योग्य ती कार्यवाही करावी यासाठी आज श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर अ‍ॅड. डॉ.अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी तसेच विविध संघटनांच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन दि.14 रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयाच्या आवारात पार पडले. यावेळी उपोषण कर्त्यास उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्फत सदरील प्रकरणात योग्य ती सखोल चौकशी करून संबंधितावर योग्य ती कायदेशीर कारवाई करणार असल्याचे लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. उपोषणास अप्पर तहसिलदार चारुशीला पवार, नायब तहसीलदार सायली नांदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप तेजणकर, उपनिरिक्षक प्रकाश बोराडे यांनी भेट देऊन मध्यस्ती केली तर यावेळी  जिवाजीराव घोडके, संतोष जौंजाळ, महेंद्र थोरात, प्रमोद काळे, राहूल  छत्तिशे, सोमनाथ धुळे, संतोष भोसले, राजाभाऊ जगताप, कोकाटे, बबलू ओहोळ दत्ता भाऊ माळी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. संजय सावंत आणि बाळासाहेबजी नाहाटा, आसाराम काळे व शरद काळे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला.

No comments:

Post a Comment