15 जून जागतिक मल्लखांब दिवस निमित्ताने वृक्षारोपण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 15, 2021

15 जून जागतिक मल्लखांब दिवस निमित्ताने वृक्षारोपण

 15 जून जागतिक मल्लखांब दिवस निमित्ताने वृक्षारोपण


ज 15 जून  जागतिक मल्लखांब दिवस  यानिमित्ताने  अहमदनगर येथील श्री रामावतार मानधना चॅरिटेबल ट्रस्ट  संचलित  महावीर मल्लखांब आणि योगा ट्रेनिंग  सेंटरमध्ये मल्लखांबाचे आराध्य दैवत  श्री बाळंभट दादा देवधर  व श्री. शिवछत्रपती पुरस्कार विजेते, मल्लखांब दिन या संकल्पनेचे प्रणेते असे कै. दत्ताराम दुदम सर यांना अभिवादन करत श्री रामावतार मानधना चॅरिटेबल ट्रस्ट चे श्री मोहन शेठ मानधना, यांच्या हस्ते  तसेच महावीर मलखांब सेंटरचे मुख्य प्रशिक्षक श्री उमेश झोटिंग, प्रणिता तरोटे, ऋतुजा वाल्हेकर,  सायली शिंदे, डव्होकेट निलेश हराळे  व सर्व खेळाडू यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले, तसेच या सेंटर मध्ये प्रशिक्षण घेत असलेले सुमारे 100 विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी वृक्षारोपण केले, मल्लखांब हा खेळ
सह्याद्रीच्या कुशीतला आणि महाराष्ट्रातल्या मातीतला खेळ असून आता या खेळाला संपूर्ण जगाने मान्यता दिलेली आहे,  भारताबरोबरच अमेरिका, इंग्लंड,जपान रशिया, अशा अनेक देशात हा खेळ लोकप्रिय होत आहे, मल्लखांब अतिशय कमी वेळात संपूर्ण शरीराला व्यायाम देणारा एकमेव व्यायाम प्रकार आहे आणि आणि आपल्या अहमदनगर शहरात बालिकाश्रम रोड वरील या मैदानात गेल्या दहा वर्षापासून शेकडो मुले मुली  मल्लखांबाचा नियमित  सराव करत आहे अशी माहिती श्री मोहन शेठ मानधना यांनी दिली.व सर्व खेळाडू, प्रक्षिक्षक, पालक यांना जागतिक मल्लखांब दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment